सिगरेटचं व्‍यसन साेडायचं आहे, ‘या’ सात टिप्स फाॅलाे करा..!

जागतिक स्तरावर तंबाखूचा वापर हे कर्करोगाचे (cancer) प्रमुख कारण म्हणून ओळखला जाते, शिवाय तंबाखू सेवनाचा इतर आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच, या विषयावर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो.

धुम्रपान हे तंबाखूच्या वापराचा जगभरातील सर्वात सामान्य प्रकार आहे. ही एक व्यसनाधीनतेची सवय आहे, जी दीर्घकालीन, प्रतिकूल आरोग्यावर परिणाम करते. सिगारेटमध्ये रसायने असल्याने हे व्यसन आरोग्यासाठी घातक ठरते, सिगरेटचं व्‍यसन सोडणे ही एक कठीण लढाई असली तरी ती अशक्य नाही. म्हणूनच, अशा हानिकारक (cancer) सवयीपासून मुक्त होण्यासाठी या काही टिप्स आहेत त्‍या जाणून घेवूया…

धुम्रपान का करावं वाटतं ? कारण शोधा
या प्रश्नाचं तुमचं वयक्तिक पॉवरफुल उत्तर तुम्हाला मदत करेल, हे उत्तरच तुम्‍हाला धुम्रपान सोडण्यासाठी प्रेरणा देईल. हे कारण समजल्यानंतर तुम्ही हळूहळू साधेपणाने ही सवय सोडू शकता. याचा अर्थ तुम्ही एका जागी पूर्णपणे ही सवय पूर्णपणे संपवावी असं नाही, तर दिवसेंदिवस सिगारेटची संख्या कमी करावी.

स्वत:ला व्‍यस्‍त ठेवा
तुम्ही जेव्हा तुमची सवय तोडता तेव्हा स्वत:ला इतर अनेक गोष्टींमध्ये व्‍यस्‍त ठेवा. जेणेकरून तुमच्या मेंदूला धुम्रपान करण्‍याचा विचार करायला संधीच मिळणार नाही

सातत्याने खा किंवा च्युइंगम चगळा
धूम्रपान करणारी व्यक्ती जेव्हा फक्त निकोटीन सेवनावरवर अडकलेलेच नाही तर त्याच्या आहारी गेलेली असते. सातत्याने .िसिगारेट किंवा बिडी ओढण्‍याची सवय लागलेल असेल त्यांनी फळे खाण्याचा प्रयत्न करावा कींवा तोंडात च्युइंगम टाकून चघळावे, जेणेकरून तुमच्या मेंदूला धूम्रपान करण्‍याची तलफ हाेणार नाही.

भरपूर पाणी प्या
शरीराला दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला धूम्रपान थांबवायचे असते, तेव्हा पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे अशा व्यक्तींनी पाणी भरपूर प्यावे.

व्यायाम करायला सुरूवात करा
नियमित व्यायाम तुमच्यातील निकोटीनची लालसा काढून टाकण्यास मदत करते. व्यायाम तुमच्यातील चिंता काढून टाकतो. तुम्हाला ताजे तवाणे ठेवतो आणि तुमची उर्जा वाढवतो.

इतर पेय घेणे टाळा
तुम्ही जर घातक पेय घेत असाल तर धूम्रपान टाळणे अवघड आहे. तुम्ही जर कॉफी, चहा घेताना धूम्रपान करत असाल तर ते घेणे काही दिवस टाळा. धूम्रपानातील ट्रीगर ओळखा आणि धूम्रपान टाळा.

प्रयत्न करत रहा
बर्‍याच वेळा ठरवून देखील अनेकवेळा काही व्यक्ती धूम्रपान करतात. एखाद्यावेळी ठरवून देखील तुम्ही सिगारेट पेटवली आणि धूम्रपान केले, तरी निराश होऊ नका. त्याऐवजी तुमची पुनरावृत्ती कशामुळे झाली याचा विचार करा आणि टाळण्याचा पुन्हा प्रयत्न करा.

हेही वाचा :


WhatsApp वर मिळणार पैसे! करा ‘हे’ छोटं काम…


कोल्हापुरात महापूर आला तरी वीजपुरवठा होणार नाही खंडित!


MH CET Exam: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *