गर्भवती महिलांना रंगपंचमी खेळायची असेल तर, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच रंग(color) उधळून साजरी कराविशी वाटणारी रंगपंचमी आता अगदी जवळ आली आहे. लहान मुलांनी तर धुलिवंदनच्या काही दिवस आधीपासून रंग खेळायला सुरुवात केली आहे, मात्र बऱ्याचदा गरोदर महिलांना धुलिवंदन खेळावे की खेळू नये, असा प्रश्न पडतो, कारण त्यांच्याकरिता स्वत:ची आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते.
रंग(color) खेळताना शारीरिक धावपळ होते शिवाय खूप जणांच्या सान्निध्यात हा खेळ खेळला जातो, त्यामुळे काही वेळा निष्काळजीपणाही होऊ शकतो. जे तुमच्यासाठी आणि बाळासाठी घातक होऊ शकते यासाठी रंगपंचमीची मजा ही गरोदर महिलांसाठी आहे का ? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिलांना रंगपंचमी खेळायची असेल तर त्या काही खास मुद्द्यांचे पालन करून रंग खेळण्याचा आनंद घेऊ शकतात. जाणून घेऊया.
– धुलिवंदनाच्या दिवशी खेळण्यात येणाऱ्या रासायनिक रंगांपासून दूर राहा. कारण या रंगांमध्ये पारा, कॉपर, सल्फेट, शिसे यासारखे हानिकारक पदार्थ असतात. यामुळे त्वचा आणि श्वसनविकार होण्याची शक्यता असते. याचा त्रास भविष्यात बाळ आणि गर्भवती महिलेला होऊ शकतो, त्यामुळे तुमचे आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहिल अशा सेंद्रिय आणि नैसर्गिकरित्या तयार केलेल्या रंगांनी होळी साजरी करा.
- रंगपंचमी खेळण्याआधी नखांवर पारदर्शक नेलपेंट लावा. यामुळे नखांना लागलेला रंग(color) सहजरित्या काढणे शक्य होते.
- त्वचा, केस यांचे नुकसान टाळण्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत अंगाला खोबरेल तेल लावा, जेणेकरून शरीरात रंग शोषला जाणार नाही.
- पेट्रोलियम जेलीचा थर ओठांवर, कानांवर आणि मानेच्या मागच्या बाजूला लावा, यामुळे रंग सहजपणे निघून जायला मदत होईल.
- गर्दीच्या ठिकाणी जाऊन होळी खेळणे टाळा. यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. यामुळे अकाली प्रसुती किंवा गर्भपाताचा धोकाही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
- मसालेदार, तळलेले, चटपटीत, गोड किंवा मादक पदार्थ खाणे टाळा. या पदार्थांच्या सेवनाने आजारी पडण्याची शक्यता आहे.
बाळ 6 महिन्यांचे असल्यास
जर तुमचे बाळ 6 महिन्यांपेक्षा लहान असेल, तर त्यालाही होळीचे रंग लावू नका, कारण बाळाची त्वचा अतिशय नाजूक असते आणि रोगप्रतिकारक शक्तीही अपरिपक्व असते. यावेळी हानिकारक रंगांऐवजी, बाळाच्या त्वचेवर लाल चंदनाचा टिळा लावू शकता.
Smart News:-
कोल्हापूर : ‘द काश्मीर फाईल्स आणि पावनखिंड चित्रपट करमुक्त करा’
ठाण्यात रंगणार मनसे विरुद्ध IPL सामना, हे आहे कारण…
अरे व्वा! आईसह जेवणाचा आस्वाद घेऊन फोटो करा शेअर; होळीला सरकारकडून खास आवाहन