मनुक्याचा आहारात समावेश करा आणि त्याचे अनेक फायदे मिळवा!

मनुका हा ड्राय फ्रूटचा एक भाग आहे. मनुक्याचे (raisins) सेवन केल्यास अनेक आजारांपासून सुटका होते. मनुका शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवते. मनुक्याचा आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात. मनुके हे द्राक्षांपासून बनविले जाते. द्राक्षांना वाळवून मनुके तयार केले जातात.
मनुक्याचे सेवन केल्यास फायदा कसा होईल हे जाणून घ्या
१. फास्ट फूड आणि वेळेवर न खाण्यामुळे अनेकांची पचनक्रिया बिघडते, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी मनुका (raisins) फायदेशीर ठरू शकते. बद्धकोष्ठतेच्या त्रासात याचे सेवन आपण करू शकतो.
२. बाहेरील अन्नपदार्थांमध्ये अधिक प्रमाणात चरबी असते, अशावेळी आपले वजन (Weight) वाढते. मनुका खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. त्यात आढळणारी नैसर्गिक साखर (Sugar) शरीराला ऊर्जा देते. यासोबतच कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते.
३. बहुतेकांना अँनिमियाचा त्रास असतो अशा लोकांनी दररोज मनुका खाल्ल्यास शरीरात रक्ताची कमतरता भासणार नाही.
४. आपल्यापैकी बहुतेक लोक दुधाचे (Milk) सेवन करत नाहीत. अशावेळी आपण आपल्या आहारात मनुके समाविष्ट करू शकता. शरीरात कॅल्शियमचे प्रमाणही चांगले देते. त्यासाठी रोज आपण ४-५ मनुके खाऊ शकतो.
५. घसा खवखवणे, कोरडे पडणे किंवा खाज येणे अशी समस्या असल्यास मनुके रात्री भिजवून सकाळी खावीत. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहे, ज्यामुळे आपल्याला आराम मिळतो.
६. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असलेल्यानी संध्याकाळी मनुके धुवून त्याच्या बिया काढून रात्री झोपण्यापूर्वी खा. त्यावर गरम दूध प्या. हे नियमित केल्याने फायदा होईल.
७. लहान अनेक वेळा वेळा आजारी पडतात. त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मनुके उपयुक्त ठरू शकतात. त्यांना दररोज गरम दुधात मनुके खाऊ घालावे.
८. मनुके खाल्ल्याने दृष्टीही वाढते. त्यात बीटा कॅरोटीन असते. यासाठी मनुके रात्री भिजत ठेवावीत आणि सकाळी खावीत.
हेही वाचा :