…तर तुम्ही आंब्याची कोय कचऱ्यात टाकणारच नाही! पाहा फायदे!

आंबट-गोड अशी वैशिष्ट्यपूर्ण चव असलेला आंबा (Mango) बहुतांश जणांना आवडतो. हापूस, केसर असो किंवा रायवळ, प्रत्येक आंब्याची चव, गुणवैशिष्ट्यं वेगवेगळी असतात. त्यामुळेच आंब्याला फळांचा राजा (King Of Fruits) म्हणतात. आरोग्याच्या (Health) दृष्टीनं आंबा अतिशय पोषक मानला जातो. आंब्यासोबतच त्यातली कोयदेखील पोषक घटकांनी युक्त असते. त्यामुळे आंबा खाल्ल्यावर कोय टाकून देत असाल, तर अशी चूक करू नका. कोयीवर प्रक्रिया करून चूर्ण तयार करता येतं. हे चूर्ण अनेक आजारांवर उपयुक्त ठरतं.
भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि फिलिपिन्स या देशांचं आंबा (king of fruits) हे राष्ट्रीय फळ आहे. मुघल बादशहा अकबरने बिहारमधल्या दरभंगा येथे एक बाग तयार केली होती. त्या बागेत अकबरने एक लाख आंब्याची झाडं लावली होती. पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) मालदा जिल्ह्यातला आंबा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळं केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. आंब्यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन आणि अॅंटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आंबा आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. केवळ आंबाच नाही, तर आंब्यातली कोयदेखील आरोग्यासाठी उपयुक्त असते.
सौंदर्यवृद्धीसाठीही कोयीचा वापर करता येतो. चेहरा चमकदार दिसण्यासाठी आंब्याच्या कोयीचं चूर्ण चेहऱ्यावर सुमारे तीस मिनिटं लावावं. यात बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असतं. त्यामुळे सुकलेली त्वचा (Skin) चमकदार होते. तसंच मुरमांसारख्या आजारांवरदेखील हा सर्वोत्तम उपाय आहे; मात्र हा उपाय रात्रीच्या वेळी करणं आवश्यक आहे.
सध्याच्या काळात अॅसिडिटी (Acidity) ही सर्वसामान्य समस्या समजली जाते. या समस्येवर कोयीचं चूर्ण गुणकारी ठरतं. कोयीमध्ये सायट्रिक अॅसिड असतं. पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी हे अॅसिड उपयुक्त ठरतं. हंगामात रोज एक आंबा खाल्ल्यास बद्धकोष्ठता, मूळव्याधीसारखे आजार दूर राहतात. अतिसारामुळे (Diarrhea) त्रस्त असाल तर कोयीचं चूर्ण घेतल्याने आराम पडू शकतो. कोयीचं चूर्ण तयार करून ते एक ग्लास पाणी आणि मधासोबत घेतल्यास अगदी काही वेळातच या समस्येपासून तुमची सुटका होईल.
आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोयीचं सेवन केल्यास हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तसंच कोलेस्टेरॉलची पातळीदेखील नियंत्रणात राहते. आंब्याच्या कोयीमुळे ब्लड शुगर (Blood Sugar) पातळीही नॉर्मल राहते. आंब्याची कोय हा अॅनिमियावर सर्वोत्तम उपाय आहे.
आंब्याच्या कोयीत फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रोगांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित होते. परिणामी आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसंच कॅन्सरसारख्या (Cancer) गंभीर आजारांपासून बचाव होतो.
हेही वाचा :