अंडी खाण्याच्याबाबतीत ही चूक कधीही करू नका; किडनी खराब होण्याचं कारण ठरू शकतं

संन्डे हो या मंन्डे, रोज खाऊ अंडे(egg), असं आपल्याकडं म्हटलं जातं. अंडी खाणं अनेकांना आवडतं. बहुतेक लोक नाश्त्यामध्ये अंडी खाणे पसंत करतात. काहींना अंडी उकडवून खायला आवडतात, तर काहींना ऑम्लेट बनवून.
कुणाला अंडी(egg) करी, तर कुणाला अंड्याची भुर्जी आवडते. काही लोक तर दिवसातून तीन-चार अंडी खातात. परंतु, दिवसातून जास्त अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.
आपण कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणात खाल्ली तरच त्याचा जास्त फायदा (Summer Health Tips) होतो. अंडी हा उष्ण पदार्थ असल्याने उन्हाळ्यात जास्त खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढते. पोटाचे आजार, अपचन, गॅस, पुरळ अशा समस्या असतील तर त्या आणखी वाढू शकतात. शरीरातील उष्णता वाढल्याने जुलाब देखील होऊ शकतात.
अधिक अंडी(egg) खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते, ते जाणून घेऊया. हे पोषक घटक अंड्यांमध्ये असतात अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते, जे डोळे, त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते. याव्यतिरिक्त, त्यात फॉस्फरस, लोह, जीवनसत्व A, B6, B12, सेलेनियम, झिंक, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल, मॅग्नेशियम, फोलेट, सोडियम इ. जास्त अंडी खाण्याचे तोटे मेडिसर्कलमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, अंड्यांमध्ये साल्मोनेला (Salmonella) नावाचा जीवाणू आढळतो.
जो कोंबडीपासून अंड्यात येतो. आपण अंडी(egg) नीट उकडली नाहीत तर हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जाऊन आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. योग्य प्रकारे शिजवलेले अंडी खाणे फायदेशीर आहे. कच्ची अंडी खाणं चुकीचं असून त्यामुळे पोटात सूज येणे, उलट्या होणे आणि पोटाशी संबंधित समस्या जसे की अपचन, पोटदुखी, जळजळ, जडपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात.
अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यावर इतरही अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने किडनीवर विपरीत परिणाम होतो. हे अगदी परफेक्ट जीन्स तुम्हाला मिळणारच! कधीही खरेदी करताना या टिप्स ध्यानात ठेवा काही लोकांना अंड्याची अॅलर्जी असते, अशा लोकांनी अंडी खाणे सरळ टाळावे.
मर्यादित प्रमाणात अंडी खाल्ल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. रोज 1-2 अंडी खाण्यात काही नुकसान नाही, पण उन्हाळ्यात दिवसा एकच अंडे(egg) खाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अंड्यांसोबत काय खात आहात, या गोष्टीही लक्षात ठेवा, चुकीचे फूड कॉम्बिनेशन आरोग्याला हानीकारक ठरू शकते. अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉल देखील असते, त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी अंडी दररोज खाऊ नयेत.
त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका वाढू शकतो. हे तुम्हीही जेवणानंतर लगेच पाणी पिता का? इतके प्रॉब्लेम्स नकळत मागे लागतात अंडी खाण्याचे फायदे स्नायू मजबूत होतात. मेंदू आणि मज्जासंस्था व्यवस्थित काम करतात.
शारीरिक ऊर्जा तयार होते. प्रतिकारशक्ती मजबूत राहते. हृदय निरोगी राहून हृदयविकाराचा धोका कमी होतो. गरोदरपणात अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
फक्त 300 च्या EMI वर घरी घेऊन या Smart Inverter;
‘या’ राज्यात आपचा भाजपवर मोठा पलटवार, निवडणुकीच्या तोंडावरच 18 मोठे नेते फोडले
शर्वरी वाघ शॅम्पेन कलरच्या बॅकलेस स्लिप ड्रेसमध्ये
बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांची पाकिस्तान बॉर्डरवर मोठी कारवाई