खाण्यापूर्वी 6 तास सुका मेवा पाण्यात भिजवा, आयुर्वेदानुसार होतील जबरदस्त फायदे

Nuts

अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध तसेच प्रथिने आणि फायबरयुक्त सुकामेवा(Nuts) खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामध्ये जीवनसत्त्व ई, कॅल्शियम, सेलेनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि रायबोफ्लेविन हे घटक भरपूर प्रमाणात असतात याशिवाय लोह, पोटॅशियम, जस्त आणि जीवनसत्त्व बी, नियासिन, थायमिन आणि फोलेट ही तत्त्वेही सुकामेव्यामध्ये असतात.

त्यामुळे सुकामेव्याचे दररोज सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते, मात्र आहारात सुकामेव्याचा समावेश करण्यापूर्वी आयुर्वेदानुसार काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

आयुर्वेदानुसार, सुका मेवा पचायला जड असतो, त्यामुळे सुकामेवा(Nuts) कोरडा खाल्ल्यास काही जणांना पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. म्हणूनच योग्य कारण ते निरोगी चरबी, प्रथिने आणि तंतूंच्या चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे ते पचण्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, बेदाणे, काजू, पाईन नट्स हा सुकामेवा योग्य पद्धतीने कसा खावा, याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

6 ते 8 तास पाण्यात भिजवावेत
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सुकामेवा पाण्यात 6 ते 8 तास भिजत घालावा. यामुळे त्यातील उष्णता कमी होऊ लागते शिवाय फायटिक अॅसिड आणि टॅनिनही निघून जायला मदत होते. अशा पद्धतीने भिजवलेला सुकामेवा खाल्ल्याने तो सहजरित्या पचतो. पचनास हलका होतो. एखाद वेळी खाण्याआधी तो पाण्यात भिजवण्यास विसरलात तर तो खाण्याआधी भाजून घ्यावा त्यानंतर त्याचे सेवन करावे. भाजलेला आणि कच्चा सुका मेवा खाल्ल्यानेही फायदा होतो.

सुका मेवा खाण्याची योग्य वेळ
दररोज सकाळी उपाशीपोटी सुकामेवा(Nuts) खावा. त्याव्यतिरिक्त सायंकाळी नाश्त्याच्या वेळीही सुकामेवा खाल्ला तरी चालतो, मात्र अति प्रमाणात सुका मेवा खाऊ नये.

किती प्रमाणात सेवन कराल?
ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे, अशा व्यक्तिंनी दररोज व्यायामानंतर याचे सेवन करावे. त्यानंतर आवश्यक तेवढे पाणी प्यावे. दररोज मूठभर सुकामेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जास्त सुकामेवा खाल्ल्याने अपचन, पोट जड होणे, उष्णतेच्या समस्या, डायरिया, वजन वाढणे, भूक न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात, कारण यामध्ये मेदाचे प्रमाण 80 टक्के असते. ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे, शरीराला सूज येणे, अल्सरेटिव्ह कोलाइटिस, अॅलर्जी अशा समस्या उद्भवू शकतात.

Smart News:-

मदतीचा बहाणा करून चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास


“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट


शाळाबाह्य बालकांसाठी 5 ते 20 जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’


राज्यात दिवसभरात 5,218 रुग्णांची भर


Leave a Reply

Your email address will not be published.