राज्यात दिवसभरात 5,218 रुग्णांची भर

Corona patient

राज्यात काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत वाढ दिसून येत असतानाच गुरुवारी करोना रुग्णसंख्येने(Corona patient) पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज 5218 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

तर आज दिवसभरात एकूण 4989 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2479 रुग्णांची भर पडली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात आज केवळ एका करोनाबाधित रुग्णाने(Corona patient) आपला जीव गमवला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,77,480 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्‍क्‍यांवर पोहोचले आहे.

राज्यात आज एकूण 24,867 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 13614 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5488 सक्रिय रुग्ण आहेत.

Smart News:-

मदतीचा बहाणा करून चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास


“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट


शाळाबाह्य बालकांसाठी 5 ते 20 जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’


मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय,


Leave a Reply

Your email address will not be published.