दुसऱ्यांदा आई होताना महिलांनी ‘या’ गोष्टींची जरूर काळजी घ्यावी!

mother

गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसचं गर्भधारणेनंतर महिलांना त्यांच्या जीनवशैलीमध्ये अनेक बदल करावे लागतात. ज्यावेळी महिला पहिल्यांदा आई होते तेव्हा तिला स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी लागते. कारण पहिल्यांदा आई (mother) होणं फार कठीण असतं. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का, पहिल्यांदा नव्हे तर दुसऱ्यांदा आई होताना महिलांना त्यांच्या आऱोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते.

जाणून घेऊया दुसऱ्यांदा आई होताना महिलांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी

वजन नियंत्रणात ठेवा

दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही आई (mother) होणार असता त्यावेळी तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्याबाबतील काळजी घ्यावी लागते. दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान प्रजनन हार्मोन्स राखण्यासाठी तुमचं वजन नियंत्रणात असणं खूप गरजेचं असतं.

फिटनेसवर लक्ष द्या

गर्भावस्थेत महिलांनी फिटनेसवर लक्ष्य देणं महत्त्वाचं असतं. यासाठी तुम्ही एक्सपर्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. केवळ पहिल्यांदाच नव्हे तर दुसऱ्यांदा आई होण्यासाठी एक्सरसाइज करणं फायदेशीर मानलं जातं.

औषधांना वेळेवर घ्यावं

अनेक महिला असं मानतात की, दुसऱ्यांदा आई होणाऱ्या काळात औषधांविना आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. मात्र तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, तुम्हाला दिलेली औषधं तुम्ही नियमित स्वरूपात घेतली पाहिजेत. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

Smart News:-

महाराष्ट्र तापला! उष्णतेच्या लाटेसंदर्भात हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा…


जोडीदार रुसलाय? या ४ मार्गांनी काढा जोडीदाराचा रुसवा


चाहत्याने KL Rahul ला का दिली आथियाची शप्पथ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *