तुम्हीही ‘या’ पोझिशनमध्ये झोपत असाल तर सावधान, नाहीतर…

दररोजच्या थकलेल्या दिवसांनंतर प्रत्येक व्यक्तीला रात्री आराम आणि शांत झोपेची (sleep tips) गरज असते. कारण झोप आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक अशा विविध समस्या जडतात. तसंच यामुळे आपली कार्यक्षमता आणि आरोग्य खालावण्याचीही शक्यता असते. मात्र पुरेश्या झोपेसोबतच झोपेची पोझिशन देखील तितकीच महत्त्वाची असते.
दमल्यानंतर आपण रात्री बेडवर विविध पोझिशनमध्ये झोपतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, झोपेच्या प्रत्येक पोझिशनचा आपलाला फायदा होतो. मात्र काही पोझिशनमुळे नुकसानही होऊ शकतं.(sleep tips)तुम्हाला माहिती आहे का, झोपेची एक पोझिशन अशी आहे, की तिच्यामुळे आपल्या नर्वस सिस्टमचं नुकसान होऊ शकतं. जाणून घेऊया कोणती आहे ती स्लीपिंग पोझिशन. आणि जर तुम्हीही अशा पोझिशनमध्ये झोपत असाल तर असं झोपणं आजपासूनच टाळा.
पाठीवर झोपून डोक्याखाली घेणं ठेवणं
अनेकजण पाठीवर झोपतात पण काही जणांना पोटावर झोपण्याचीही सवय असते. मात्र यापैकी काही दोन्ही हात डोक्याखाली घेऊन झोपतात. आणि झोपेची हीच पोझिशन फार चुकीची आहे. तुम्ही जर या पोझिशनमध्ये झोपत असाल तर आजच ही पोझिशन बदला. ही झोपण्याची पोझिशन तुम्हाला आरामदायक वाटत असेलही चुकीची पद्धत आहे.
डोक्याखाली हात घेऊन झोपल्यानंतर तुमच्या खांद्याच्या नसा दाबल्या जातात. त्यामुळे या नसा डॅमेज म्हणजेच त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत झोपणाऱ्या व्यक्तींनी दुसऱ्या दिवशी हात, मान आणि खांद्याचा भाग बधीर झाल्यासारखं वाटतं.
अपुरी झोप रोगप्रतिकारक शक्तीसाठी घातक
अनेक अभ्यासांच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पुरळ उठतात. त्याचप्रमाणे पुरेशी झोप न मिळणं हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी घातक ठरू शकतं आणि याचा परिणाम म्हणजे, इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
Smart News:-
- बिहार, प. बंगालच्या काही जिल्ह्यांचा नवा केंद्रशासित प्रदेश? घुसखोरांच्या समस्येवर तोडगा काढणार
- शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ?
- तुम्हीही ‘या’ पोझिशनमध्ये झोपत असाल तर सावधान, नाहीतर…