जेवणानंतर 2 मिनिटे चालल्याने शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम, जाणून घ्या कसे ?

Smart News:-जेवणानंतर 2 मिनिटे चालल्याने शरीरावर होऊ शकतात 'हे' परिणाम, जाणून घ्या कसे ?

Smart News:- सध्याच्या अत्यंत व्यस्त जीवनशैलीचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खाणे, झोपणे आणि बराचे वेळ एकाच जागी बसून काम करणे अशी बहुतेक लोकांची जीवनपद्धती ठरलेली आहे, मात्र तुम्ही असेच करत असाल तर वेळीच सावध होण्याची अत्यंत गरज आहे, कारण रात्रीच्या जेवणानंतर लगेचच झोपी गेल्याने लठ्ठपणासारखा आजार होऊ शकतो.

याचा थेट परिणाम पचनसंस्थेवरही होऊ शकतो. यासाठी अन्न खाल्ल्यानंतर काही वेळ चालणे आवश्यक आहे. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, जठरासारख्या आजारांपासून दूर राहायला मदत होते.

जेवणानंतर केवळ दोन ते पाच मिनिटे चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी चालणे आवश्यक आहे. बहुतेक लोकांच्या मनात प्रश्न पडतो की जेवणानंतर किती वेळ चालावे? जेवणानंतर चालण्याचे काय फायदे आहेत? एका अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, जेवणानंतर 15 मिनिटे चालल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. टाइप 2 मधुमेहासारख्या गुंतागुंत टाळण्यास मदत करू शकते. मात्र, दोन मिनिटे चालल्यानेही तुमच्या शरीराला फायदा होऊ शकतो.

जेवणानंतर चालल्यामुळे शरीरावर होणारा परिणाम
अभ्यासानुसार, अन्न खाल्ल्यानंतर 60 ते 90 मिनिटे चालल्यामुळे शरीरावर चांगला परिणाम होतो. रक्तातील साखरेची वाढ कमी करण्यासाठी चालणे आवश्यक आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. युआन अॅशले सांगतात की, जेवणानंतर केलेली थोडीशी हालचालही फायदेशीर आहे. जेवल्यानंतर लगेच झोपी जाण्याऐवजी स्वयंपाकघर साफ करणे, भांडी स्वच्छ करणे, केर काढणे इत्यादी कामे करू शकता. यामुळे शरीराची थोडी हालचालही होते. याकरिता रात्री जेवणानंतर किमान 20 मिनिटे चालणे आवश्यक आहे. जास्त वेळ असेल तर वेळ वाढवूही शकता. जेवणानंतर तासाभरात चालणे आवश्यक आहे.

जेवल्यानंतर फेरफटका मारण्याचे फायदे

– आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेवल्यानंतर 20 मिनिटे चालल्यास लठ्ठपणाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो, कारण चालण्याने चयापचय क्रियेत वाढ होते आणि वजन कमी करण्यासाठी चयापचय योग्य असले पाहिजे.

– रात्रीच्या जेवणानंतर चालणेदेखील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते, शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात. चालल्यामुळे अवयवांचे कार्य चांगले राहते.

– अन्न खाल्ल्यानंतर काही वेळाने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाता तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते यामुळे हायपरग्लायसेमियाचा धोका कमी होतो.

– रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामुळे सूज कमी होते, बद्धकोष्ठतेची शक्यता कमी होते आणि पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्यांपासून आराम मिळतो.

Smart News:-

मंकीपॉक्‍सचा वाढता प्रादुर्भाव : अमेरिकेने घेतला ‘मोठा’ निर्णयडेड बॉडी सडत होती, तरीही FTII प्रशासनाला कळलं कसं नाही?


CM ममता बॅनर्जींनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; पंतप्रधानांकडे केली 1 लाख कोटींची मागणी


उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन; आणखी दोघांना अटक, NIA ला मोठं यश

Leave a Reply

Your email address will not be published.