कोणताही रासायनिक पदार्थ न वापरता आंब्याचा रस वर्षभर टिकवून ठेवा…

Smart News:-कोणताही रासायनिक पदार्थ न वापरता आंब्याचा रस वर्षभर टिकवून ठेवा...

Smart News:-आंबा (Mango) खायला आवडत नाही, अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. आमरस, आंबा पोळी, आम चटका, मँगो शेक, रायता असे नानाविध पदार्थांच्या रुपात खाता येणारं फळ वर्षातून एकदा खायला मिळतं, म्हणून वर्षभर पुरवून पुरवून खाता यावं याकरिता टिकवून ठेवावसं वाटतं.

उन्हाळ्यात रोज आंबा खायला मिळाला तरी मन भरत नाही, असं वाटत राहतं. म्हणून आंबा वर्षभर टिकवण्याकरिता या काही खास टिप्स. कोणताही रासायनिक पदार्थ न वापरता आंब्याचा रस टिकवून ठेवता येऊ शकतो. यामुळे जेव्हा आंबा खावासा वाटेल तेव्हा अगदी कमी वेळातच आमरस मॅंगो शेक तयार करता येऊ शकतो.

आंब्याचे क्युब्ज

आमरस न करता आंब्याचे क्युब करून आंबा टिकवून ठेवता येतो. यासाठी आंब्याच्या फोडी करा. त्यावर अलगद काप देऊन आंब्याच्या गराचे चौकोनी क्युब करून घ्या. हे क्युब एका भांड्यात जमा करा. एक कप आंब्याचे क्युब असतील तर त्यात एक चमचा साखर टाका. हे क्युब आता एका झिपलॉक बॅगमध्ये टाका. बॅग पूर्णपणे लॉक करण्याआधी तिच्या एका कोपऱ्यात स्ट्रॉ टाका. स्ट्रॉ ने बॅगमधली सगळी हवा काढून घ्या आणि आता बॅग पूर्णपणे लॉक करा. अशा छोट्या छोट्या प्लॅस्टिक बॅगमध्ये आंब्याचे क्युब भरून ठेवा आणि या सगळ्या बॅग एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून फ्रिजरमध्ये स्टोअर करा.

आंब्याचा रस

– आंब्याचा रस करा. एक कप रस असेल तर एक टेबलस्पून साखर या हिशोबाने साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या. पिठीसाखरही घालू शकता. साखरेमुळे आंब्याचा रंग आणि चव जशीच्या तशी राहते.
– हा रस आता झिपलाॅक बॅगमध्ये भरा. बॅग अगदी काठोकाठ भरू नका. त्यातली हवा काढून घ्या आणि त्यानंतर बॅग पूर्णपणे लॉक करा. या बॅग एअर टाईट डब्यात ठेवा आणि फ्रिजरमध्ये स्टोअर करा.

– आंब्याचा रस प्रिझर्व्ह करण्याची दुसरी पद्धत म्हणजे आंब्याचा रस करून तो बर्फाच्या ट्रेमध्ये टाका. 4 ते 5 तास फ्रिजरमध्ये ठेवल्यानंतर त्याचे क्युब तयार होतील. हे क्युब नंतर काढा आणि ते झिपलॉक बॅगमध्ये टाकून ठेवा. स्ट्राॅच्या मदतीने हवा काढून घ्या आणि त्यानंतर बॅग लॉक करा. ही बॅग एअरटाईट डब्यात ठेवून फ्रिजरमध्ये स्टोअर करा.

– आंबा प्रिझर्व्ह करण्याच्या प्रक्रियेत त्याला पाणी लागणार नाही, याची काळजी घ्या. त्यामुळे हात, भांडे सगळे अगदी कोरडे हवे. पाण्याचा अंश जरी लागला तरी रस काही दिवसांतच खराब होईल.
– जेव्हा प्रिझर्व्ह केलेला आंब्याचा रस वापरायला काढाल, तेव्हा जेवढा पाहिजे तेवढाच रस काढा. तो काढतानाही तुमचा हात, चमचा अगदी कोरडे पाहिजे. उरलेला रस पुन्हा लगेचच फ्रिजरमध्ये स्टोअर करून ठेवा.

Smart News:-

आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात…


महाविकास आघाडी सरका मध्ये काँग्रेस नाराज


संसदेत भाजपचा एकही मुस्लीम खासदार नाही;


फक्त 3 दिवसात ‘सरसेनापती हंबीरराव’चं विक्रमी कलेक्शन


एसबीआय ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *