खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळा; अन्यथा कारवाई अन्न व औषध प्रशासनाचा व्यावसायिकांना इशारा

Smart News:- अन्न सुरक्षेच्या नियमांनुसार खाद्यतेलाचा वापर तळण्यासाठी शक्यतो एकदाच करावा. खाद्यतेलाचा पुनर्वापर करताना तयार होणारे ‘ट्रान्सफॅट’ टाळण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त तीन वेळेस वापर करावा. या नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
ज्या अन्न व्यावसायिकांकडून ५० लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर केला जातो, अशा व्यावसायिकांनी खाद्यतेलाच्या पुनर्वापराची लेखी माहिती ठेवावी. उपयोगात आलेल्या खाद्यतेलाची माहिती अन्न सुरक्षा व मानद प्राधिकरण, नवी दिल्ली या मान्यताप्राप्त संस्थेकडे द्यावी. तसेच, त्याबाबतचा अभिलेख जतन करावा अशी तरतूद आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा मानद कायदा कलम ५५, ५७ व ५८ आणि भा.दं.वि. कलम २७२ व २७३ नुसार कारवाईची तरतूद आहे.
Smart News:-
5 हजारांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन या 40-इंचाचा शानदार Smart TV
ड्रोनच्या माध्यमातून भारतात पोहोचवली जाते हेरोइन; धक्कादायक खुलासा…
शस्त्रक्रिये नंतर मुख्यमंत्री ठाकरे प्रथमच मंत्रालयात
Corona चे आणखी 2 नवे व्हेरिएंट सापडल्याने खळबळ…