नव्या व्हेरिएंटचा शिरकाव

Smart News:-नव्या व्हेरिएंटचा शिरकाव

पुण्यात सात रुग्ण आढळले, कोरोनाने चिंता वाढवली

Smart News:- महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक बातमी आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट बीए ४ आणि बीए ५ चे एकूण सात रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात हे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्टवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांचे निदान झाले आहे.

पुण्यात ओमिक्रॉनच्या दोन नव्या सब व्हेरिएंट म्हणजेच बीए ४ चे चार तर बीए ५ चे तीन रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे हे व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी मास्क सक्तीबाबत सुचक इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मास्क सक्ती होणार असल्याची शक्यता आहे. मुंबई शहरात अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.  राज्यात कोरोना टेस्ट वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने त्या ठिकाणची वाढती रुग्ण संख्या चिंता करायला लावणारी आहे. त्यासाठी ज्या भागात रुग्ण संख्यांचा आकडा वाढत आहे त्या ठिकाणी टेस्टिंग संख्या वाढवण्याची गरज आहे, म्हणून टेस्टिंग वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता मास्क सक्ती जरी नसली तरी मास्कबाबत नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, लोकांनी अलर्ट रहावे. नाहीतर मास्क सक्तीचा विचार करावा लागेल असा इशारा ही यावेळी त्यांनी दिला आहे.

 

Smart News:-

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार सात जणांवर गुन्हा


कोल्हापूरला खंडपीठ होणे गरजेचे राऊत यांचे वक्तव्य


‘क्‍वाड’ बैठकीतून काय साधले?


निखतच्या जिद्दीची कहाणी


सतत थकल्यासारखं वाटतं? १५ दिवसात रक्ताची कमतरता दूर करतील रोजच्या जेवणातले ४ ‘फूड कॉम्बिनेशन्स’

Leave a Reply

Your email address will not be published.