चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या तरी टेन्शन नको; घरच्या घरी दह्याचा असा उपयोग करून बघा परिणाम

Smart News:- चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या तरी टेन्शन नको; घरच्या घरी दह्याचा असा उपयोग करून बघा परिणाम

Smart News:- चेहरा, त्वचेवर सुरकुत्या (Wrinkles) दिसू लागणं हे साधारणपणे वृद्धत्वाचे लक्षण मानले जाते. वयाच्या 40 वर्षांनंतर अनेकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात.

पण, हल्ली कमी वयात तरुणांमध्येही चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची समस्या वाढली आहे. कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, एकदा सुरकुत्या येऊ लागल्या की त्या घालवणं खूप अवघड काम होतं. काहीजण शस्त्रक्रियेद्वारे सुरकुत्या घालवतात, मात्र ते सर्वसामान्य माणसाला परवडणारं नाही.

दुसरीकडे, महागड्या सौंदर्य उत्पादनांचे रासायनिक दुष्परिणाम त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. यावर काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही दुष्परिणामांची चिंता न करता सुरकुत्या घालवू शकता. हा घरगुती उपाय म्हणजे दही (Curd). दह्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचं प्रमाण बऱ्याचअंशी कमी होऊ शकतं.

जाणून घेऊया सुरकुत्यांची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय. सुरकुत्या पडल्याची लक्षणं – सुरकुत्यांवर उपचार करण्यापूर्वी सुरकुत्या नेमक्या कोणत्या भागावर आहेत हे लक्षात घ्या. चेहऱ्यावर झालेले काही बदल लक्षात घेऊन सुरुवातीच्या टप्प्यातच आपण सुरकुत्यांवर इलाज सुरू केला तर चांगला परिणाम होतो. डोळे, तोंड आणि मानेवर बारीक रेषा, चेहऱ्याच्या त्वचेत ढिलेपणा, ओठ आणि डोळ्यांजवळ खोल सुरकुत्या दिसत असतील तर आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे, अन्यथा दिवसेंदिवस त्या वाढत जातात.

सुरकुत्या येण्याचं कारण काय? वृद्धापकाळात अनेकांना सुरकुत्या पडतात. पण कमी वयात सुरकुत्या येणं हे अति ताणतणाव, शरीरात व्हिटॅमिन D3 ची कमतरता, सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर, धूम्रपान, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांचा परिणाम आहे. हे अगदी परफेक्ट जीन्स तुम्हाला मिळणारच!

कधीही खरेदी करताना या टिप्स ध्यानात ठेवा उपाय जाणून घ्या – सुरकुत्या घालवण्यासाठी दही हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. आठवड्यातून दोनदा दह्याचा फेस पॅक लावून तुम्ही सुरकुत्या सहज कमी करू शकता. यासाठी 3-4 चमचे दह्यात 1 चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळून पेस्ट बनवा. आता हे चेहऱ्यावर आणि मानेला चांगले लावा.

20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. असं आठवड्यातून 2-3 वेळा केल्याने तुम्हाला परिणाम दिसेल. हे तुम्हीही जेवणानंतर लगेच पाणी पिता का? इतके प्रॉब्लेम्स नकळत मागे लागतात सुरकुत्यांवर दही फेसपॅकचे फायदे – दही आणि ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेल्या फेस पॅकमुळे सुरकुत्या तर कमी होतात शिवाय त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते.

यासोबतच लॅक्टिक अॅसिड आणि नैसर्गिक एन्झाईम्सने समृद्ध दही त्वचेच्या पेशी स्वच्छ करून त्वचेवरील डाग घावण्याचे काम करते. दुसरीकडे, ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, डी, ई आणि व्हिटॅमिन के, जे अँटी-ऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत मानला जातो, सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेला संरक्षण देण्यासाठी उपयुक्त आहे.

 

Smart News:-

भारतीय बॅडमिंटन संघटनेला पत्र लिहित सायनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय


‘Pfizer आणि Moderna पेक्षा भारतीय लस चांगल्या’, अदर पूनावाला यांचा दावा


नडला की तोडला ! माकडाच्या नादी लागला अन्…


मुंबई इंडियन्सची बॉलिंग ‘फॅक्ट्री’, इकडे गेलेला फॉर्म परत मिळेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *