Smoking : धूम्रपानाचा पुढील पिढ्यांवरही परिणाम

लहान वयातच म्हणजे तारुण्यापूर्वी कुणाला धूम्रपानाचे व्यसन असेल, तर त्याचा फटका पुढील चार पिढ्यांना बसण्याची शक्यता असते, असे संशोधकांनी म्हटले आहे. धूम्रपानाचा प्रभाव किती पिढ्यांपर्यंत (generations) राहतो हे शोधणारे असे पहिलेच संशोधन आहे. त्याला ‘ट्रान्सजनरेशन इफेक्ट’ असे म्हटले जाते.
जर एखादी व्यक्ती वयाच्या तेराव्या वर्षीच धूम्रपान करू लागली, तर अशा व्यक्तीच्या पुढील पिढ्यांमध्येही (generations) त्याचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ नावाच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. संशोधकांनी बायोमार्कर वापरून याबाबतचे संशोधन केले. धूम्रपान आणि हवेच्या प्रदूषणाचा परिणाम अनेक अवयवांवर होतो.
फुफ्फुसं, हृदय, मेंदूशी संबंधित आजार तसेच लठ्ठपणासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्या पिढ्यान्पिढ्या पुढे जातात. बाळ गर्भात असताना आईने धूम्रपान केले तरीही अनेक पिढ्यांपर्यंत या समस्या पोहोचतात. तसेच गर्भातील बाळाचाही अचानक मृत्यू होऊ शकतो. ब्रिस्टाल युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
हेही वाचा :
‘माझा मृत्यू हे तुला लग्नाचं गिफ्ट,’ व्हॉट्सअॅप वर व्हिडीओ स्टेटस ठेवत…