राज्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर, आज 231 नव्या रुग्णांची भर

राज्यातील कोरोनाची(Corona) आकडेवारी स्थिर असल्याचं चित्र आहे. आज राज्यात 231 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात बुधवारी 221 रुग्णांची भर पडली होती.
राज्यात आज एका मृत्यूची नोंद
गेल्या 24 तासामध्ये राज्यामध्ये एका कोरोनाबाधिताचा(Corona) मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर हा स्थिर असून तो 1. 87 इतका आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,30,789 इतके कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 78,80,074 इतकी झाली आहे.
राज्यामध्ये 1434 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत असून ती 860 इतकी आहे. तर त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी 288 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.
देशातील स्थिती
देशात कोरोना विषाणूच्या वाढता आलेख मागील काही दिवसापासून घटताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 827 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेनं नवीन कोरोना(Corona) रुग्णांची संख्या 70 ने घटली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी कोरोनाबळींची संख्या 54 होती.
मुंबई: राज्यातील कोरोनाची आकडेवारी स्थिर असल्याचं चित्र आहे. आज राज्यात 231 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात बुधवारी 221 रुग्णांची भर पडली होती.
Smart News:-
बाळाचं नाव विचार करुन सरकारी नोंदणीत एकदाच नोंदवा
ब्रॅडन मॅक्युलम इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक; ECB ची घोषणा
वानखेडे स्टेडियमची बत्ती गूल, MI vs CSK मॅच DRS शिवाय सुरू!
कॉंग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर उद्यापासून
महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर