उन्हाळ्यात पित्त वाढतं? घरगुती उपाय नक्की करून पाहा

summer

उन्हाळा (summer) म्हणजे चिकचिक, घाम आणि उन्हाचा ताप. या सगळ्याबरोबर आरोग्याच्या समस्याही येतातच. उन्हाळ्याता अन्नपचन (digestion) नीट न होण्याची समस्या अनेकांना जाणवते. अनेकांना उन्हाळ्यात पित्ताचा (Acidity) त्रास होतो. हे खवळलेलं पित्त कमी करण्यासाठी लगेच डॉक्टर्सकडे जाण्याची गरज नाही. काही घरगुती पदार्थांच्या साह्याने पित्त आटोक्यात आणता येणं शक्य आहे. अशा काही पदार्थांविषयी माहिती घेऊ या. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याबद्दलची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

उन्हाळ्यातल्या (summer)  अतिरिक्त उन्हामुळे वातावरणातली उष्णता वाढते. त्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती मंदावते. त्यामुळेच या दिवसांत पोट बिघडणं, मुरडा, उलट्या होणं, पोटात वायू धरणं, पित्त होणं अशा पोटाच्या विविध तक्रारी उद्भवतात. पित्तामुळे हैराण होणाऱ्यांची संख्या तर खूप मोठी आहे. त्यासाठीच काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. घरातले काही पदार्थ वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर पाणी प्यायला हवं. त्यामुळे शरीरातली नकोशी असलेली अथवा विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात. त्याचबरोबर पोटाला आणि शरीराला थंडावा देणारे आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ जरूर सेवन करावेत.

नारळपाणी (Coconut Water)- नारळ अत्यंत बहुगुणी आहे. त्यातल्या पाण्यातही अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. नारळाच्या पाण्यामुळे शरीरातली पाण्याची कमतरता भरून निघते आणि थंडावा मिळतो. पचनशक्ती सुधारते. डिटॉक्सिफाय अर्थात निर्विष करण्याचे गुणधर्म असल्याने पित्तावरही नारळाचं पाणी गुणकारी ठरतं.

थंड दूध (Cold Milk)- पित्तावर रामबाण उपाय म्हणजे थंडगार दूध पिणं, असं म्हटलं जातं. या दुधामुळे घशाकडची जळजळ थांबते. पित्त कमी होतं आणि पोटात थंडावा मिळतो; पण थंड दूध प्यायचं म्हणून मुद्दाम दूध फ्रीजमध्ये ठेवू नये. बाहेरच्या तापमानाला थंड झालेलं दूध प्यायलेलं उत्तम.

खरबूज (Muskmelon) – खरबुजामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. खरबुजामध्ये पाण्याचं आणि फायबर्सचं अशा दोन्ही घटकांचं प्रमाण जास्त असल्याने पोटात वायू धरणं किंवा पित्त होण्यासारख्या समस्यांवर त्याचा चांगला उपयोग होतो.

ताक (Buttermilk)- उन्हाळ्यात ताकाशिवाय जेवण जणू अपूर्णच. ताकातल्या काही विशिष्ट जिवाणूंमुळे शरीरातल्या पित्तावर नियंत्रण राहतं. शिवाय पोटाला थंडावा मिळतो तो वेगळाच. त्यामुळे उन्हाळ्यात जेवताना ताक प्यायला विसरू नका.

केळी (Banana)- उन्हाळ्यात पिकलेली केळी खाल्ल्याने शरीराला लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि फायबर हे घटक मिळतात. पोटॅशिअममुळे पित्तावर नियंत्रण ठेवता येतं. फायबर अर्थात तंतुमय गुणधर्म असल्याने पचनविषयक तक्रारी दूर होतात.


हेही वाचा :


तुम्ही टोल भरला; आम्ही घालविला – चंद्रकांत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *