ताकाचे आहेत ‘हे’ बहुमूल्य फायदे, जाणून घ्‍या..!

buttermilk

उन्हाळा आला की शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ताकाचा आहारात समावेश केला जाताे. ताक पिण्याचे इतरही बहुमूल्‍य फायदे आहेत.चला तर मग जाणून घेवूया, ताक (Buttermilk ) पिण्याचे फायदे.

 ताकाची तुलना अमृताशी
Buttermilk आपल्या प्राचीन ग्रंथात ताकाची तुलना ही अमृताशी केली आहे. ताक हे असे पेय आहे की जे आपल्या शरीराला घातक असे पदार्थ आपल्या शरीरातून लघवीद्वारे बाहेर काढते. ताकात विटामिन बी-१२, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस असतात जी मानवी शरीरास खूपच उपयुक्त असतात. ताकात बरेच पदार्थ घालुन त्याची चव एकदम रुचकर केली जाते. उदा. ताकात जिरे पावडर, कोथंबीर, हिरव्या मिरच्या घालणे. हे सर्व घटक ताकाची चव आणि ताकाचा औषधी गुणधर्म वाढवतात. प्रत्त्येकजण आपल्या आवडीनुसार हे घटक घालत असतो.

Buttermilk

१) ताक  पिल्याने वजन कमी होवुन लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

२) पोट साफ होत नसेल, पोटातून आवाज येत असेल तर ताकात ओवा घालुन प्या. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल.

३) बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास असतो. उन्हाळ्यात तर ताे खूपच जाणवतो. सततचा होणारा पित्ताचा त्रास कमी करावयाचा असेल तर ताकात साखर आणि काळी मिरी घालुन प्या. पित्ताचा त्रास कमी होतो.

४) शरीरातील उष्णता खूप झाली आहे आणि ती त्वरीत कमी करायची आहे तर ताक प्या. उन्हाळ्याच्या दिवसात ताक पिले तर नक्कीच उष्णता कमी होईल.

५) ताकाचे सेवन केल्‍याने उष्णता कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते.

buttermilk

६) जर तुमचं डोकं दुखत असेल तर जायफळ पावडर टाकून ताक प्या.

७) लघवी करताना जर जळजळ जाणवत असेल तर ताकात गुळ घालुन प्या. आणि वारंवांर लघवीला येत असेल तर ताकात मीठ घालुन प्या.

८) तोंड आले असता ताकाने हळुवार गुळण्या केल्यास तोंड लवकर बरे होते.

९) उन्हाळ्यात घामाद्वारे आपल्या शरीरातून पाणी बाहेर पडत असते. बऱ्याचवेळा पाण्याची कमतरता जाणवते. ही कमतरता भरून काढण्यासाठी ताक उपयोगी पडते.

१०) काहीवेळा उचकी आपल्याला अचानक लागते. तेव्हा घरगुती उपाय म्हणजे ताक. ताकात कोरडे आले टाका आणि ते प्या. आल्यास ताकात कोरडे आले टाका आणि त्याचे सेवन करा. उचकी दूर होईल.

(वरील उपाय हे तज्ज्ञां‍चा सल्ला घेवुनच करा.)

हेही वाचा :


प्रेमासाठी महिला सरपंचाने केल्या सर्व मर्यादा पार..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *