उन्हाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी, वाचा सविस्तर

कडाक्याचा उन्हाळा सुरु असून गरमीचा तडाखा वाढत चालला आहे. वाढत्या गरमीमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. उन्हाळ्याच्या काळात (Summer) विशेष काळजी न घेतल्यास तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकता.
त्यामुळे आजारांपासून वाचण्यासाठी योग्यरित्या काळजी घेणं गरजेचं असतं.
आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात(Summer) खबरदारी घेण्याची गरज आहे. यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या आणि संभाव्य उष्माघाताचा धोका टाळा. तीव्र उन्हात फिरणे टाळावे. हे शक्य नसल्यास, शरीरातील पाण्याची पातळी प्रमाणात राहील, याची खबरदारी घेतली पाहिजे.
मुलांनी नॉर्मल थंड पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे जे अत्यंत महत्वाचे आहे. आपले हात, पाय इत्यादी मूलभूत गोष्टीची स्वच्छता राखणे. कडक उन्हापासून दर रहा. सुती कपडे आणि हलके कपडे घाला. जास्त काळ उन्हात थांबू नका. पाणी अधिक असलेली टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, मोसंबी ही फळे खावीत.
दरम्यान, उन्हात फिरताना ओआरएस पावडर टाकलेले पाणी पीत राहावे. उन्हाळ्यात(Summer) रस्त्याच्या कडेला ज्यूस पिऊ नये कारण त्यात वापरलेले पाणी कोणते आहे हे तुम्हाला माहित नसते. उन्हाळ्यात योग्य फिटिंग अंडरवियर्स घाला जेणेकरून बुरशीजन्य संसर्ग होणार नाही. अंडरगारमेंट आणि कपडे गरम पाण्यातुन काढू शकता जेणेकरून जीवाणू नष्ट होतील.
Smart News:-
चार वर्षांत वाहनकराचे ३२,४०० कोटी गेले तरी कुठे?
कच्च्या तेलाचे दर वाढले ; इंधनाच्या दरात कोणतीही वाढ नाही ?
कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी…
आता सिग्नलशिवाय iPhone वापरता येणार; आपात्कालिन स्थिती मेसेजही पाठवू शकाल!
मुलाच्या जन्मानंतर 12 दिवसांनी भारती सिंहने व्यक्त केली अशी इच्छा, चाहतेही हैराण