कांद्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

Onion Oil

आपल्याला माहित असेल की, (Onion Oil Benefits) केसांच्या समस्यांसाठी अनेकजण कांद्याचा किंवा कांद्याच्या तेलाचा वापर करीत असतात. परंतू या व्यतिरीक्त कांद्याच्या तेलाचे काय फायदे आहेत, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

– केस पांढरे होण्यापासून रोखते (Prevents Hair From Turning White)
कांद्याच्या तेलात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळतात. त्याचप्रमाणे कांद्यामधील अँटिऑक्सिडंट (Antioxidant) गुणधर्म केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवण्याचे कार्य करते.

– कोरड्या केसांना मॉइश्चरायझ करते (Moisturizes Dry Hair)
कांद्याचे तेल कोरड्या केसांना आर्द्रता देते. हे केस मजबूत आणि मुलायम होण्यास मदत करते. तसेच याच्या वापराने केसांची चमकही वाढते.

– केसांना चमकदार बनवते (Makes Hair Shiny)
कांद्याच्या तेलाचा केसांवर कंडिशनिंगसारखा प्रभाव पडतो. हे शैम्पू करण्यापूर्वी वापरता येते.

– डोक्यातील कोंडा घालवते (Anti-Dandruff)
कांद्याचे तेल कोंडा साठी खूप फायदेशीर आहे. ते तुमची टाळू स्वच्छ करते. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होते.

– केस वाढतात (Hair Growth)
कांद्याच्या तेलात सल्फर असते जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. याशिवाय ज्यांचे केस पातळ आहेत ते कांद्याच्या तेलाच्या वापराने केस जाड करू शकतात (Onion Oil For Hair Growth).

– घरी कांद्याचे तेल कसे बनवायचे (Onion Oil Recipe)
कांद्याचे तेल बनवण्यासाठी कांदा मिक्सरमध्ये फिरवून घेणे. त्यानंतर पॅनमध्ये खोबरेल तेल टाका आणि पेस्ट मिक्स करा. नंतर उकळूद्या आणि काही वेळाने गॅस बंद करा. मिश्रणापासून तेल वेगळे होऊ लागताच ते मिक्स होऊ द्या. नंतर थंड झाल्यावर तेल गाळून घ्या.

Smart News:-

“व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला”; इम्तियाज जलील यांचे ट्वीट


बंडखोर आमदारांची पहिली पसंत ‘भाजप’, 5 वर्षांत तब्बल 182 जणांनी घेतलीय शरण


चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल


सोनिया गांधींनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी मागितला वाढीव वेळ


विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे अनुदान – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड


 

Leave a Reply

Your email address will not be published.