ओठांच्या तक्रारी दूर करण्यासाठी घरगुती ‘लिप मास्क’ वापरा

lips

कडक उन्हाळ्याचा परिणाम बऱ्याचदा ओठांवरही(lips) होतो. ओठ कोरडे आणि रुक्ष होतात. कोरड्या आणि रुक्ष ओठांतून रक्तही येऊ शकते. यासाठी हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही ओठांची काळजी घेणे गरजेचे ठरते.

याकरिता या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणे, आहारात कलिंगड, टरबूज, काकडी अशी पाणीदार फळे आणि भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे तसेच या दिवसांत ओठ कोरडे होऊ नयेत याकरिता त्यांना नियमित मॉइश्चराइझ करणे आवश्यक आहे. चेहऱ्याच्या फेस मास्कप्रमाणे ओठांसाठी घरगुती पदार्थांचा वापर करून मास्क तयार करू शकता. यामुळे ओठ फाटणे, त्यातून रक्त येणे, कोरडे पडणे अशा समस्यांपासून सुटका व्हायला मदत होते.

एवोकाडो लिप मास्क
डिहायड्रेशनमुळे ओठ फाटले असतील, तर एवोकाडो फळापासून तयार केलेला मास्क फायदेशीर आहे. या फळात जीवनसत्त्व आणि खनिजाचे प्रमाण जास्त असते. यामुळे ओठ मुलायम होतात शिवाय ओठांच्या(lips) इतर तक्रारीही दूर व्हायला मदत होते. एवोकाडो लिप मास्क तयार करण्यासाठी एका छोट्या भांड्यात पिकलेल्या एवोकाडोचा गर घेऊ घ्यावा. त्यामध्ये 1 चमचा मध घालून व्यवस्थित एकजीव करावे. हा मास्क 15 मिनिटे ओठांना लावून ठेवावा. त्यानंतर एका कापडाने ओठ स्वच्छ पुसावेत.

खरबूज लिप मास्क
ओठांवरील(lips) टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही उपाय शोधत असाल तर याकरिता खरबूज लिप मास्काचा उपाय करून बघा. खरबूज या फळात अँण्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हामुळे ओठ काळवंडणे, ओठ टॅन होणे या समस्या दूर होण्यासाठी हा मास्क परिणामकारक आहे. याकरिता एका भांड्यात थोडासा खरबूजाचा तुकडा स्मॅश करा किंवा मिस्करमधून वाटून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे गुलाब पाणी आणि 1 चमचा दही घाला. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. आता हे मिश्रण ओठांवर लावा. 10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर वाळल्यावर स्वच्छ ओल्या टॉवेलने ओठ पुसून घ्या.

पपई लिप मास्क
जर तुम्हाला तुमचे ओठ मऊ, मुलायम व्हावे असे वाटत असेल तर यासाठी पपईचे लिप मास्क गुणकारी ठरते. पपईमध्ये पोषक तत्त्वे असतात. यामुळे ओठ कोमल, मऊ होतातच शिवाय ओठांवरील(lips) काळेपणाही दूर व्हायला मदत होते. हे मास्क तयार करण्याकरिता पपईची फोड किसून कुस्करून घ्या. आता यामध्ये 1 चमचा मध मिसळा. हे दोन्ही पदार्थ एकजीव करून ओठांना लावा. 15 मिनिटांनी ओठांना स्क्रबप्रमाणे मसाज करून स्वच्छ करा.

उन्हाळ्याच्या दिवसांत फळांपासून तयार केलेले हे लिप मास्क उन्हापासून ओठांवर(lips) होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी मदत करतात.

Smart News:-

Elon Musk च्या ऑफरबाबत Twitter च्या बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर


UPI Payment करताना ‘ही’ चूक कधीही करु नका, जाणून घ्या माहिती


“पवारांच्या भूमिका लोकांना माहितीयेत, ट्वीटचा फायदा नाही”; वळसे-पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर


अमेरिकेत कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर बंदी


‘या दोन टीमला तळाशीच राहू द्या, ते तिथंच चांगले दिसतात’; माजी क्रिकेटरचे अजब वक्तव्य


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *