वजन कमी करायचंय? तर ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

Weight Loss

हल्ली वाढलेल्या वजनामुळे(Weight Loss) अनेक जण त्रस्त आहेत. त्यात गेल्या दोन वर्षांत वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढणं आणि पोटाचा घेर वाढणं, या गोष्टी तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

वजन कमी करण्यासाठी काही जण जिमला जातात, तर काही डाएट करतात. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारावर विशेष लक्ष द्यायला हवं. काही घरगुती साहित्याच्या मदतीन तुम्ही वजन कमी(Weight Loss) करू शकता. यासंदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.

मेथीचे दाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असलेल्या काही गोष्टींचा उल्लेख आणि वर्णन आयुर्वेदात केले आहे. मेथीचे दाणे त्यापैकीच एक आहे. मेथीचे दाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा आणि ते खा आणि त्याचे पाणी प्या.

यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल, तसेच तुमच्या रुटीनमध्ये यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. मेथीमध्ये प्रथिनं, खनिजं, व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स असतात. शिवाय, कॅन्सर आणि मधुमेहाला प्रतिकार करणारे घटकही त्यात असतात. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासाठीही मेथीचा उपयोग होतो.

तसंच, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मेथी उपयुक्त असून, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. वाढलेले वजन कमी करण्यासह इतरही अनेक कारणांसाठी मेथी उपयुक्त आहे.

बडीशेप बडीशेपमध्ये पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन-बी9 मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे ती पोटासाठी खूप फायदेशीर मानली जाते. अनेकांना रोज जेवणानंतर बडीशेप खायची सवय असते.

पण बडीशेपपासून बनवलेले ड्रिंक त्यापेक्षाही फायदेशीर असते. एका भांड्यात बडीशेप उकळवून त्याचे पाणी गाळून ते प्या. या बडीशेपच्या पाण्यामुळे महिन्याभरात तुमचे वजन कमी(Weight Loss) होण्यास सुरुवात होईल.

त्रिफळा मेटाबॉलिक रेट कमी असल्याने लठ्ठपणाची समस्या सुरू होते.

त्यामुळे तुम्ही त्रिफळा खाऊन तुमच्या पोटाचं आरोग्य सुधारू शकता. रोज एक चमचा त्रिफळा पाण्यात टाकून प्यायल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल.

लिंबूपाणी आपल्या शरीरात नको असलेले विषारी घटक अर्थात टॉक्सिन्स तयार होत असतात. रोज सकाळी लिंबूपाणी व मेथीचे दाणे आहारात घेतल्यास हे अपायकारक घटक शरीराबाहेर टाकले जाऊ शकतात.

तसंच तुम्ही कोमट पाण्यात मध मिसळून त्याचं सेवन केल्यास तुमची पाचनक्रिया व्यवस्थित राहते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) असतं आणि हे व्हिटॅमिन प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास हातभार लावतं. त्यामुळे रोज सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने त्याचाही फायदा शरीराला होतो. त्यामुळे तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये लिंबू पाण्याचा समावेश करू शकता.

Smart News:-

‘फ्युजन आवडत नाही… ‘ विरोध करणाऱ्यांना राहुल देशपांडे यांनी सुनावले


प्रगती एक्सप्रेसचा विस्टाडोम कोचद्वारे प्रवास सुरू


इलॉन मस्क आणि गुगलचे सह-संस्थापक सर्गी ब्रिन यांच्या पत्नीचे प्रेम प्रकरण? मस्कने केला इन्कार मात्र…


मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, मुहूर्तही ठरला, शिंदेंच्या आमदाराने दिली Update


Leave a Reply

Your email address will not be published.