white hair | अखेर कारण समोर आलंच; का होतायत केस पांढरे?

बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच केस पांढरे (white hair) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र केस पांढरे होण्यामागचं कारणही जाणून घेणं आवश्यक आहे. शरीरात अशा जीवनसत्त्वाची कमतरता असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

लहान वयात केस पांढरे (white hair) होण्याची एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात, परंतु जर तुमच्यात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर ही समस्या उद्भवू शकते. विटामिनला एस्कॉर्बिक अॅसिड असेही म्हणतात, जे केसांना कोरडे होण्यापासूनच रोखत नाही तर केस गळण्याची समस्या देखील दूर करते.

व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते ज्यामुळे केस पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. याशिवाय केस मजबूत होतात आणि कोरडेपणाही दूर होतो. हेच कारण आहे की, आरोग्य तज्ञ केसांच्या चांगल्या वाढीसाठी जेवणात व्हिटॅमिन सीचा समावेश करण्यास सांगतात.

व्हिटॅमिन सी अनेक प्रकारच्या फळे आणि भाज्यांमध्ये आढळते. जर तुम्ही दररोज सुमारे 4 ग्रॅम या पोषक तत्वांचे सेवन केले तर डोक्यातील रक्ताभिसरण चांगले होईल, ज्यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होतात.

व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी संत्री, द्राक्ष, पेरू, जामुन आणि पपई या फळांचे सेवन करावे. भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर कोबी, ब्रोकोली, पालक आणि टोमॅटो खाल्ल्याने बरेच फायदे होतील. केसांमध्ये पोषणाची कमतरता भासू देऊ नका ही गोष्ट लक्षात ठेवा.

हेही वाचा :


सतत मोबाईलवर खेळते म्हणून भावाने हटकलं, बहिणीने आयुष्य संपवलं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *