घरातून बाहेर पडण्यापूर्वी का खातात दही- साखर?

‘घरातून बाहेर पडण्याआधी हे घे, दही (yogurt) साखर खा…. ‘, हा डायलॉग आपण ऐकलाच असेल. आता हा डायलॉग म्हणावा, कारण दही- साखरेचा हा सीन आपण आजवर बऱ्याच मालिका- चित्रपटांमध्ये पाहिला आहे. म्हणजे सुरुवातीला ही भानगड काय, तेच कळेना. पण, जेव्हा याचं महत्त्वं समोर आलं, तेव्हा मात्र दही आणि साखर खरंच खाणं किती महत्त्वाचं आहे, ही बाब पटली.
दही आणि साखर खाण्याचे फायदे
दही (yogurt) आणि साखर खाल्ल्यामुळं लगेचच शरीरात ग्लुकोज तयार होतं. ज्यामुळं संपूर्ण दिवसभर शरीरात एक प्रकारची उर्जा तयार होते. दही आणि साखरेमुळं मानसिक शांतताही मिळते. या मिश्रणाच्या सेवनाने सकारात्मक शक्तींचा शरीरातील वास वाढतो. म्हणूनच की काय, घरातून बाहेर पडण्यापूर्वी कायमच दही- साखर हातावर ठेवली जाते.
तसं पाहिलं, तर दही शरीरासाठी कोणा एका वरदानाहून कमी नाही. दह्याच्या सेवनामुळे पाचन तंत्र सुधारतं. पोटाचे विकार कुठच्याकुठे पळून जातात. पोटात थंडावा राखण्यासाठीही दह्याचं सेवन केलं जातं.
दह्याच्या जोडीला साखर येताच शरीरात आवश्यक घटकांची पूर्तता होऊन दिवसभर उर्जा टिकून राहते. म्हणूनच घरातून बाहेर पडताना कायमच चमचाभर दही- साखर खावं.
हेही वाचा :