हिवाळ्यात खायला पौष्टिक असणाऱ्या बाजरी मेथी पुऱ्या कशा तयार करायच्या?

potassium

Bajari Benefits: बाजरीमध्ये पोटॅशियम(potassium), मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक घटक मानले जातात. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी ही पोषक तत्व शरीराला आवश्यक असतात. विशेषतः हिवाळ्यात बाजरी खाण्याला जास्त महत्व आहे.मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. आजच्या लेखात आपण हिवाळ्यात खायला पौष्टिक असणाऱ्या बाजरी मेथी पुऱ्या कशा तयार करायच्या याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.(potassium)

साहित्य :

एक वाटी स्वच्छ केलेली मेथी

कोथिंबीर

आलं

मिरची

दोन वाटी बाजरी पीठ

अर्धा वाटी बेसन

ओवा

हिंग

हळद

मीठ

धणे पावडर

गोडा मसाला

कृती:

सर्वप्रथम तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. कारण हे पीठ भिजवून ठेवलं तर ते नंतर सैल होतं. निवडून धुऊन चिरलेली मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, मिरची, बाजरी पीठ, ओवा, हिंग, हळद, मीठ, धणे पावडर, गोडा मसाला टाकावा. हे सर्व एकत्र करून घट्टसर पीठ भिजवून पुऱ्या काढाव्यात. बाजरीसोबत जोड म्हणून तांदूळ पिठी, कणिक किंवा थालीपीठ भाजणी पण घालता येते. त्यामुळे पुऱ्या मऊ  राहतात.

Smart News:-