अरे बापरे… मानवी शरीरात सापडला बर्ड फ्लूचा नवा स्ट्रेन

bird flu

H3N8 Bird Flu’s New strain In Humans : कोरोनानंतर आणखी एका नव्या आजाराची भर पडली आहे. चीनमध्ये बर्ड फ्लूच्या(bird flu) H3N8 स्ट्रेनच्या पहिला मानवी रुग्ण सापडला आहे. चार वर्षांच्या मुलाला H3N8 Bird Fluचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, आरोग्य अधिकारी स्पष्ट केले की, लोकांमध्ये हा संसर्ग पसरण्याचा धोका अजूनही कमी आहे. (World First Human H3N8 Bird Flu Case)

2002 मध्ये पहिली घटना

H3N8चा पहिल्यांदा 2002 मध्ये उत्तर अमेरिकेत विषाणू आढळून आला होता. यानंतर घोडे, कुत्रे आणि सील यांना संसर्ग झाला, परंतु या संसर्गाचा प्रभाव मानवांमध्ये दिसला नाही.

ताप आल्यावर मुलाची चाचणी

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, मध्य हेनान प्रांतात राहणाऱ्या एका 4 वर्षांच्या मुलामध्ये ताप आणि इतर लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या मुलाच्या या महिन्याच्या सुरुवातीला चाचण्या केल्या. ज्यामध्ये हा मुलगा H3N8 Bird Flu(bird flu) या विषाणूने पॉझिटिव्ह आढळला होता. नॅशनल हेल्थ आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, मुलाच्या कुटुंबाने घरी कोंबडी पाळली होती आणि हे कुटुंब जंगली बदकांचे वास्तव्य असणाऱ्या भागात राहत होते.

संसर्ग पसरण्याचा धोका कमी

या मुलाला थेट पक्ष्यांकडून संसर्ग झाल्याचे नॅशनल हेल्थ आयोगाने म्हटले आहे. मुलाचे केस एकतर्फी क्रॉस-प्रजाती संसर्ग आहे. लोकांमध्ये H3N8 Bird Fluचा मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका कमी आहे. तथापि, असे असूनही, आयोगाने जनतेला मृत किंवा आजारी पक्ष्यांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. ताप किंवा श्वसनाची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घेण्यास सांगितले आहे.

हा फ्लू कुक्कुटपालनामुळे

एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रामुख्याने जंगली पक्षी आणि कुक्कुटांमध्ये आढळतो. मानवांमध्ये त्याचा प्रसार होण्याची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, 1997 आणि 2013 मध्ये आढळून आलेले बर्ड फ्लूचे H5N1 आणि H7N9 स्ट्रेन, एव्हीयन इन्फ्लूएंझा पासून मानवी आजाराच्या बहुतेक प्रकरणांसाठी जबाबदार आहेत. 2012 मध्ये, H3N8 ने युनायटेड स्टेट्सच्या ईशान्य किनारपट्टीवर 160 हून अधिक सील मारले. यापैकी बहुतेक प्राण्यांमध्ये घातक न्यूमोनिया झाला होता.

हेही वाचा:


शेअर बाजारात पुन्हा घसरण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *