7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन का साजरा करण्यात येतो?

health

सात एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन (health) म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे याच दिवशी 72 वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. जागतिक आरोग्य संघटना अर्थात (WHO)ची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. त्यामुळे सात एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही सात एप्रिल 1948 रोजी झाली.

मात्र जागतिक आरोग्य (health)संघटनेचा स्थापना दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा विचार सर्व प्रथम 7 एप्रिल 1950 रोजी मांडण्यात आला. तेव्हापासून सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एकोणिसाव्या शतकात आरोग्याचा प्रश्न अंत्यत गंभीर असा होता. जगभरात विविध साथीच्या आजारांचे (Illness) थैमान सुरू असे. या आजारात अनेकांना आपला जीव गमवावा लागे. ही समस्या दूर करण्यासाठी एखादी संस्था असावी, असा विचार सर्वप्रथम 1948 रोजी आला आणी त्यातूनच पुढे सात एप्रिल 1950 रोजी डब्लूएचओची स्थापना झाली.

जागतिक आरोग्य संघटना निर्मितीमागील उदिष्ट
19 व्या शतकात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे विकसीत नव्हती. काही देशांकडे आरोग्य सेवा सुविधांची उपलब्धता होती, तर काही देश हे मागास आणि पारंपरीक पद्धतीने केल्या जाणाऱ्या उपचारांवर अवलंबून होते. 19 व्या शतकात साथींच्या आजारांची संख्या देखील जास्त होती. अनेक लोकांचा मृत्यू अशा आजारांमुळे होते होता. सर्व व्यक्तींना जगण्याचा अधिकार आहे. या मूलभूत विचारातून जागातील प्रमुख देशांनी एकत्र येऊन जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केली. जे देश मागास आहेत ज्या देशात पुरेशा प्रमाणात आरोग्य सोई सुविधा उपलब्ध नाहीत अशा देशांना मदत करणे तसेच एखाद्या आरोग्य विषयक आपत्तीमध्ये जगाला मार्गदर्शन करण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेकडून केले जाते.

कोरोना काळात डब्लूएचओची भूमीका
गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाच्या या काळात अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. कोरोना हे जगावर अचानक आलेलं मोठं आरोग्य संकट होते. मात्र या काळात जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनाची कोणती लस वापरावी, त्याचे साईडइफेक्ट काय असू, शकतात ते कोरोना काळात कोणत्या औषधींचा वापर करावा? कोणते औषधोपचार कोरोनावर प्रभावी असू शकतात इथपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच जे देश गरीब आहेत, कोरोना लस आणि कोरोनावरील औषधोपचार त्यांना परवडू शकत नाहीत अशा देशांना देखील मदतीचा हात देण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आले.

हेही वाचा :


भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री; मुंबईत आढळला पहिला रूग्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *