महाराष्ट्रामध्ये दिवसा उन्हाचा तडाखा, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

महाराष्ट्रामध्ये तापमानातील(Temperature) बदल सुरूच असून, येत्या आठवड्यातही अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना सकाळी आणि रात्री थंडी, तर दिवसा उन्हाचा सामना करावा लागत आहे.

राज्यात, रविवारी (दिनांक २३), सोलापुरात सर्वाधिक कमाल तापमान ३७.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर जळगावात सर्वात कमी, म्हणजे १४ अंश सेल्सिअस तापमान होते. गेल्या काही दिवसांपासून, राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे, तर किमान तापमान कमी होत आहे.

सकाळच्या वेळी थंडी आणि दिवसा उष्णता, अशा या विचित्र हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसात तापमानातील(Temperature) हा चढ-उतार असाच राहण्याची शक्यता आहे.

पुणे , जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, सोलापूर, मुंबई, छ. संभाजीनगर, आणि नागपूर या शहरांमध्येही तापमान वाढले आहे.

हेही वाचा :

…तर विराट 41 वरच Out झाला असता! कोहलीची ‘ती’ कृती पाहून गावस्कर संतापले…

1 मार्च ‘या’ 5 राशींसाठी ठरणार वरदान! नोकरीत पगारवाढ, धनवैभव, आणि संपत्तीचे वरदान मिळेल

चेहऱ्यावर तुम्हीसुद्धा बॉडी लोशन लावता का? मग जाणून घ्या त्वचेवर होणारे गंभीर दुष्परिणाम