कोल्हापूरसह कागल, इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस(rain) झाला. अचानक आलेल्या वळवाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस झाला. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे तीन घरांचे नुकसान अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

इचलकरंजी : वळीव पावसाने(rain) शनिवारी वस्त्रनगरीत दमदार हजेरी लावली. सायंकाळी साडेसातनंतर विजांच्या कडकडाटात पावसाने सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्याची तारांबळ उडाली होती. तर, खबरदारी म्हणून महावितरण कार्यालयाकडून शहराची वीज खंडित करण्यात आली होती. गेले दोन दिवस सायंकाळनंतर केवळ ढगाळ वातावरण होत होते. त्यामुळे उष्म्यामध्ये आणखी वाढ होत होती. शनिवारी सायंकाळी साडेसातनंतर जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट करीत पावसाने वस्त्रनगरीत जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पावसाची रिपरिप सुरू होती.

शिरोळ : विजांच्या कडकडाटासह शिरोळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे व शनिवारी बाजारचा दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांची तसेच नागरिकांची मोठी धांदल उडाली. सायंकाळी सातच्या सुमारास शिरोळ, घालवाड, कुटवाड, शिरटी व शिरोळ परिसरात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली.

गडहिंग्लज : शहरासह परिसरात आज सायंकाळी जोरदार वळीव बरसला. शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या महिनाभरात तीन-चार वेळा वळीवाने तालुक्यात हजेरी लावली होती. विशेषत: तालुक्याच्या पूर्व व नेसरी भागात चांगला पाऊस झाला होता. मात्र, शहरासह परिसरात वळीव बरसलाच नव्हता. दोन-तीन वेळा तुरळक सरी कोसळून गेल्या होत्या. दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा उष्मा होता.

शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी पावसाचे वातावरण झाले होते. पण, त्याने हुलकावणीच दिली होती. दरम्यान, आज सायंकाळी आकाश दाटून आले. सहाच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. सुमारे दीड तास जोरदार पाऊस कोसळत होता. शहरात अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. शहराला तळ्याचे स्वरुप आले होते. शहरालगतच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

शिरोळ : विजांच्या कडकडाटासह शिरोळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे व शनिवारी बाजारचा दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांची तसेच नागरिकांची मोठी धांदल उडाली. सायंकाळी सातच्या सुमारास शिरोळ, घालवाड, कुटवाड, शिरटी व शिरोळ परिसरात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली.

हेही वाचा :

ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा मोदींना पाठिंबा

मोबाईल गेमर्ससाठी आनंदाची बातमी! Microsoft जुलैमध्ये स्वतःचे मोबाईल गेम स्टोर लाँच करणार

सांगलीत संजयकाका जिंकणार, अजितदादांना चार जागा सुद्धा मिळणार नाहीत, अभिजीत बिचुकलेंचे धडाकेबाज अंदाज