कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; ‘या’ जिल्ह्यात लवकरच कोसळणार

मुंबई : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या(rains) कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यानुसार, सध्या कोल्हापूर, सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यांतील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर येत्या तीन तासांत इतरही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान(rains)खात्याच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर सतर्क या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं विजा, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा

भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण

इचलकरंजीत निवडणुकीनंतर पैजांवर पैजा : कोणी पैसे लावते तर कोणी वाहनांची पैज