इतिहासकार फडणवीस आणि जयंत पाटील

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मालवणच्या राजकोट किल्ला परिसरातील(political) छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याच्या घटनेपासून महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांकडून त्याचे पूर्णपणे राजकीयीकरण केले जात आहे. आता तर छत्रपती शिवरायांच्या इतिहासात काहीजण उतरले आहेत. महाराष्ट्र इतिहास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याच्या अविर्भावात भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनीही सुरत लुटीचे”रुमाल”उघडून शिवप्रेमींना नवीनच माहिती दिली आहे. आणि तथाकथित इतिहास संशोधक, त्यावर काहीच बोलायला तयार नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांसह इतरही काही राजकीय पक्षांनी या घटनेला राज्य शासनाला जबाबदार धरले. राज्य शासनाने हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही उभारलेला नाही तर भारतीय नौदलाने तो उभा केला आहे अशी भूमिका घेतल्यानंतर विरोधी पक्ष खूपच संतप्त झाले. राज्यभर जोडेमार आंदोलन झाले. काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. निषेध मोर्चे निघाले. आणि बघता बघता हा विषय राजकीय बनला. या घटनेत कोणीही राजकारण(political) आणू नये असे आवाहन करणारेच त्याचे राजकीय भांडवल करताना दिसले.

पुतळा कोसळल्या प्रकरणी रचनाकार चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे या दोघांना मालवण पोलिसांनी अटक केल्यानंतर हळूहळू त्या विषयावरची चर्चा थांबली. पण अचानक भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी”सुरत”लुटीचा विषय काढताना वेगळीच माहिती शिवप्रेमी समोर ठेवून त्यांना चकीत करून सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, तर सुरतच्या जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा नव्हे दोन वेळा सुरत लुटली हा इतिहास शालेय अभ्यासक्रमातून आजही शिकवला जातो.

जयंत पाटील यांनी तर या संदर्भात खंडणी हा शब्द वापरल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्यावर टीकेचे तोफगोळे टाकण्यात येऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या प्रमुखाकडे”खंडणी”मागितली ती मिळत नाही असे स्पष्ट झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी खंडणी हा शब्द प्रयोग केल्यामुळे जयंत पाटील टीकेचे धनी बनले आहेत.

देवेंद्र फडणवीस तसेच जयंत पाटील हे पक्के राजकारणी(political) आहेत. ते काही इतिहासकार नाहीत. इतरांना जो इतिहास माहिती आहे तितकाच त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी सुरत लुटीचे “रुमाल” उघडण्याचे काही कारण नव्हते. आपण काही वेगळी माहिती देत आहोत या भ्रमात ते आहेत आणि इतरांना संभ्रमित करत आहेत.

इतिहासाचे”रुमाल”अशा प्रकारे उघडले जात असल्याचे पाहून ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी
राजकारण्यांचे कान पिळले आहेत. राजकारण्यांनी इतिहासकार बनू नये, आणि इतिहासकारांनी राजकारणाच्या फंदात पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. पण त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळेल असे वाटत नाही. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या आधी एक महिनाभर लंडन हून महाराष्ट्राचा आणलेल्या वाघ नखांविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. त्यावर काही राजकारणी आणि तथाकथित इतिहास संशोधक व्यक्त झाले होते.

शिवरायांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघ नख महाराष्ट्रात आणल्यानंतर ही वाघ नखे खोटी आहेत बनावट आहेत अशी टीका केली गेली. त्यामुळे वाघ नखे बघणाऱ्यांच्या मनात संशय पेरला गेला. त्यातून काय निष्पन्न झाले हे कळायला मार्ग नाही. आता तोही विषय बाजूला पडला आहे. पुतळा प्रकरणही बाजूला पडले आहे, आणि आता सुरतेची लूट आणि खंडणी या दोन विषयांवर मतप्रदर्शन फडणवीस आणि जयंत पाटील यांनी केले आहे. त्याच्याही आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी शिवप्रेमींची माफी मागितली, पण त्यांनी सावरकर या विषयावर काँग्रेस व इतर काही नेत्यांना छेडले.

त्यानंतर सावरकर हे कसे वादग्रस्त आहेत हे शरद पवार यांच्यापासून ते अनेकांच्याकडून सांगितले जाऊ लागले. एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात सध्या राजकारण सुरू आहे. आणि ते विधानसभेच्या निवडणुकी पर्यंत केले जाईल याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही.

हेही वाचा:

गणपती मंडळावर दगडफेक; सहा जणांना अटक

‘या’ राशींवर शनीदेवाचा आशीर्वाद; नव्या नोकरीसह होणार धनलाभ

शरद पवारांचं धक्कातंत्र सुरूच, भाजपच्या बड्या नेत्याकडून ‘तुतारी’चा प्रचार