हैदराबादच्या जोडप्याला तीन तासच बाळाला भेटता येणार; हायकोर्टाचे आदेश

बाळाला दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेतच भेटता येईल, असे आदेश उच्च न्यायालयाने हैदराबादच्या(hyderabad) जोडप्याला दिले. सकाळी आठ ते रात्री आठ ही वेळ आधीच्या आदेशात भेटण्यासाठी देण्यात आली होती. या आदेशात न्यायालयाने गुरुवारी बदल केला.

या जोडप्याला बाळाला भेटण्यासाठी 12 तासांचा वेळ देण्यात आला आहे. या आदेशात बदल करावा, अशी विनंती करणारा अर्ज महालक्ष्मी येथील बाल आशा ट्रस्टने केला होता. न्या. संदीप मारणे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. मुंबई पोलिसांनी हैदाराबादहून(hyderabad) आणलेले बाळ आमच्याकडे ठेवले आहे. अशा एकूण 12 लहान बाळांना मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणाहून आणले आहे. त्यातील सहा बाळे आमच्याकडे आहेत. या बाळांचे संगोपन ट्रस्ट करत आहे. हे जोडपे 12 तास ट्रस्टच्या आवारात असल्याने अडचण निर्माण होत आहे. न्यायालयाने आधीच्या आदेशात बदल करावा, अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली.

या विनंतीला जोडप्याने विरोध केला. बाळ आता ट्रस्टकडे आहे. गेले सात महिने आम्ही संगोपन करत आहोत. बाळाला हैदराबाद येथील संस्थेत ठेवावे किंवा बाळाचा ताबा आमच्याकडे द्यावा, अशी मागणी आम्ही केली होती. ही मागणी मान्य झाली नाही. न्यायालयाने आम्हाला 12 तास बाळासोबत राहण्याची मुभा दिली. या वेळेत बदल करणे म्हणजे आमच्यावर अन्याय केल्यासारखेच आहे, असे या जोडप्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. न्यायालयाने ट्रस्टचे म्हणणे ग्राह्य धरत बाळाला भेटण्याच्या वेळेत बदल केला.


काय आहे प्रकरण

बाळ अवघे सात दिवसांचे असल्यापासून आमच्याकडे आहे. महिलेचा दोनवेळा नैसर्गिक गर्भपात झाला आहे. सात महिने झाले महिला बाळाचे संगोपन करत आहे. गेल्या महिन्यात अचानक मुंबई पोलीस आले आणि बाळाला घेऊन गेले. हे बाळ आम्ही विशाखापट्टणम येथून दत्तक घेतले आहे. मुंबई पोलीस बाळाला घेऊन गेल्याने महिलेची काय अवस्था झाली असेल याचा विचार न्यायालयाने करावा व बाळाचा ताबा पुन्हा या महिलेकडे द्यावा, अशी मागणी करणारी याचिका या जोडप्याने केली.

हेही वाचा :

‘तुम्ही मला फार काळ…’, विराट कोहलीने निवृत्तीवर पहिल्यांदाच केलं भाष्य

राजकारणात भूकंप येणार? शंभूराज देसाई यांच्याकडून मोठा गौप्यस्फोट

मराठा आरक्षण मिळत नाही, डोक्यावर कर्ज; चिठ्ठी लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल