‘हे’ साध्य करणारा सध्याच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातला मी एकमेव अभिनेता!;किरण मानेंची

कधी राजकीय नेत्यांवर, कधी राजकारणावर तर कधी सध्याच्या घडामोडींवर (developments) ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपली स्पष्ट भूमिका घेत असतात. अनेकदा ते त्यांच्या ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तर देत असल्याचं पाहायला मिळतं. नुकतच त्यांनी केलेल्या एका पोस्टमधून त्यांनी त्यांच्या ट्रोलर्सना तर उत्तर दिलंच आहे, पण त्यांनी स्वत:साठीही काही गोष्टी लिहिल्या आहेत.

किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतरच्या काळाविषयी त्यांनी अनेकदा भाष्य केलं आहे. त्यानंतर सध्या अनेक प्रोजक्ट्समध्ये ते व्यस्त असून मालिका आणि सिनेमांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याविषयी त्यांनीच त्यांच्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे.

सध्याच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातला मी एकमेव अभिनेता – किरण माने
किरण माने यांनी म्हटलं की, यांनी मला संपवण्यासाठी जीवाचं रान केलं (developments). अर्वाच्य शिवीगाळ करत ट्रोल केलं. धमक्या दिल्या. त्यांच्या कारस्थानी नेत्यांना हाताशी धरून, सत्तेचा वापर करून माझं करीयर संपवण्यासाठी जीव खाऊन प्रयत्न केले. मला सिरीयलमधून काढले. एक रिॲलिटी शो व्होटिंगमध्ये जिंकूनही विजेता ठरवले नाही. पण त्यांच्या दुर्दैवानं याचा उलटा परिणाम झाला. माझ्या करीयरला आणि लोकप्रियतेला प्रचंड मोठा बूस्ट मिळाला. माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी पेटून उठलो आणि अभिनेत्यासह माझ्या ‘आत’ असलेला माणूस मी सर्वशक्तींनिशी प्रेक्षकांसमोर आणला. स्वबळावर, कुठल्याही गाॅडफादरशिवाय. लोकप्रियता दहापटींनी वाढली. एकाचवेळी अनेक क्षेत्रांत यशस्वी मुशाफिरी करण्याचं भाग्य खुप कमीजणांना लाभतं. आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगतो की अशी दुर्मिळ गोष्ट साध्य करणारा सध्याच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातला मी एकमेव अभिनेता आहे.

वैविध्यपुर्ण आणि रसरशीत आयुष्य जगायला मिळतंय – किरण माने
पुढे त्यांनी म्हटलं की, ‘यामुळे मला खुप वैविध्यपुर्ण आणि रसरशीत आयुष्य जगायला मिळतंय (developments). कधी राजकारणातलं स्टेज गाजवायचं. कधी रंगभुमीवर काळजात जपून ठेवावे असे क्षण फुलवायचे. कधी परिवर्तनाच्या चळवळीत बुद्ध, तुकाराम, शिवशाहुफुलेआंबेडकरांचे विचार मांडायचे. कधी युट्युबवरच्या एखाद्या चॅनलवरच्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातल्या अनेक अतरंगी तुकड्यांची जोडणी करत आपल्याच जगण्याचा धांडोळा घ्यायचा. कधी सिनेमा-टीव्हीच्या कॅमेर्‍यासमोर एखादी भन्नाट भुमिका अंतरंगासहित साकारायची. आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातनं जगभरातल्या मराठी माणसांशी रोज हे सगळं शेअर करत प्रेमाचे बंध जोडायचे ! किती भारीय राव हे सगळं.’

हेही वाचा :

महायुती विधानसभे साठी अजित पवार गटाला मदत करणार नाही

अमेठीतील पराभवानंतर स्मृती इराणी पुन्हा गांधींना नडणार?

राजीनामा देताना वर्षा गायकवाड यांच्या भावना दाटल्या