मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी…’ के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला!

कोल्हापूर : मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो हा माझा गुन्हा आहे का? आमदार प्रकाश आबिटकर (political) नेहमी साखर कारखान्याच्या विरोधात काम करत आहेत. सगळ्या नवीन प्रकल्पांना ते विरोध करत आहेत. आता देखील कारवाई झाली त्यामागे आबिटकरांचाच हात असल्याचा आरोप माजी आमदार तथा बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केला.

मला वैयक्तिकरित्या अडवले गेल्यास काही वाटत नाही, पण 65 हजार शेतकऱ्यांच्या कारखान्याला(political) कायम विरोध करत असल्याची टीका के पी पाटील यांनी प्रकाश आबिटकरांवर केली. कारखान्यावरील कारवाईची माहिती मी अजून अजित पवार यांच्या कानावर घातली नसल्याचेही के पी पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, के पी पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पाटील म्हणाले की बिद्री साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये फारसं काही त्यांना मिळालेलं नाही. काही किरकोळ छोट्या त्रुटी आढळल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीच्या उमदेवाराचा प्रचार केला होता. मात्र, जनतेच्या मनात वेगळंच होतं. त्यामुळे शाहू महाराज निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग विरोधात मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी सरकारवर टीका केली होती. शाहू महाराज माझ्या गावी आले होते. त्यावेळी मी त्यांचे स्वागत केले. मी शेतकऱ्यांच्या बाजून उभा राहिलो हा माझा काही गुन्हा आहे का? अशी विचारणा पाटील यांनी केली. लोकसभा निवडणुकीमध्ये 65000 मताधिक्य राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून मिळाल्याचे पाटील यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, त्यामुळे आमच्या आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नेहमी कारखाना बदनाम करणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत. कारखान्याची तपासणी 10 वेळा करा, काही अडचण नाही, पण तपासणी रात्रीची केली याचं वाईट वाटत असल्याचं पाटील म्हणाले.

येत्या निवडणुकीमध्ये आमदारांना जनता जागा दाखवेल, असा इशाराही के पी पाटील यांनी दिला. मला आता बघत बसून चालणार नाही. मला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. मी हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांचे ऐकून मंडलिकांचा प्रचार केला होता. मात्र, लोकांनी ऐकलं नाही त्याला मी काय करू? आम्ही अजून दिशा बदललेली नाही, पण लोकांनी कार्यकर्त्यांनी दिशा बदलली असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जनता सांगेल तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनता जो पक्ष सांगेल तो पक्ष मी निवडणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

हेही वाचा :

खळबळजनक!ओबीसी वगळून राजकीय नेत्यांना गावबंदी ; गावात झळकला बॅनर

लग्न जुळत नसलेल्या व्यक्तींनी आजपासून ‘हा’ उपाय सुरू करा; महिन्याच्या आत आनंदाची बातमी मिळेल

कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्ग जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न