इचलकरंजी परिसरात साकारतोय ७५ फूट उंच ध्वजस्तंभ

इचलकरंजी ता.११ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इचलकरंजी परिसरात ७५ फूट उंच (flagpole) ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. ७५ फूट उंचीवरील या ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.खोतवाडी येथील गजानन महाराज मंदिराशेजारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.कोल्हापूर नंतर या परिसरातील हा सर्वात उंच ध्वजस्तंभ असणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. १३ ते १५ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे.इचलकरंजी जवळील खोतवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरात २१ फूट उंच भारत मातेची मूर्ती,शक्ती पिठ,भक्ती पिठाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकाराम महाराज,स्वातंत्रवीर सावरकर,जगद्गुरु शंकराचार्य,झाशीची राणी लक्ष्मीबाई आदी मुर्त्या साकारण्यात आल्या आहेत.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आहेत.

म्हणून या मूर्तीच्या शेजारी ७५ फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे.हा ध्वजस्तंभ असणार आहे.या ध्वज स्तंभावर ९ फूट लांब आणि ६ फूट रुंद तिरंगा ध्वज अभिमानाने फडकणार आहे.या ध्वज स्तंभाला ही लेखणीचा आकार देण्यात आला आहे.त्यामुळे ध्वजस्तंभ आकर्षक दिसत आहे.कोल्हापूर मध्ये देशातील सर्वात उंच दुसऱ्या क्रमांकाचा ३०३ फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला होता.

त्यानंतर या इचलकरंजी परिसरात सर्वात उंच हा ध्वजस्तंभ (flagpole) असणार आहे.हिरवाईने नटलेल्या मंदिर परिसरात १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार.”ज्या लेखणीच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्य घटना दिली .त्या लेखणीचे प्रतीक म्हणून  या ध्वज स्तंभाला लेखणीचा आकार देण्यात आला आहे.”असे श्री गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष दिलीप शेंडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

मोठा दिलासा! सांगली, कोल्हापुरातील पूरस्थिती नियंत्रणात


सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप धरण परिसरातील जोर ओसरला