इचलकरंजीमध्ये घडला मन हेलावणारा अपघात..!

वॅगनआर, मोटरसायकल (motorcycle) व जनरेटर घेऊन जाणारी ट्रॉली यांच्यात झालेल्या अपघातात युवक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. दर्शन दगडू खोत (वय 20, रा. खोतवाडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर आशिष ओमप्रकाश पाल (वय 20, रा. खोतवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास यड्राव फाटा येथे घडली. युवकाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घडलेली घटना अशी, दर्शन व आशिष हे महाविद्यालयीन युवक मोटरसायकलवरून (motorcycle) इचलकरंजीकडे खासगी क्लाससाठी निघाले होते. यड्राव फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर वॅगनआर , जनरेटर घेऊन जाणारी ट्रॉली व मोटरसायकल यांच्यात हा अपघात झाला. यावेळी जनरेटर घेऊन जाणारी ट्रॉली दर्शनच्या पोटावरून गेली. तर अशिषच्या पायाला दुखापत झाली.

अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ दर्शनला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने, त्याला येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे नातेवाईक व कुटुंबीयांनी आक्रोश केला. त्यानंतर त्याचा मृतदेह येथील शवविच्छेदनासाठी आणण्यात आला याठिकाणी खोतवाडीचे नागरिक व नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती.

हेही वाचा :


जगातील सर्वात महाग शेअर; एका स्टॉकची किंमत तब्बल इतके कोटी रुपये!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *