इचलकरंजी: पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

हृदयविकाराचा तीव्र झटका (heart attack) आल्याने हुपरी पोलीस ठाण्यातील कारकून विशाल वसंतराव चौगुले (वय 37, रा. हातकणंगले) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२५) घडली. त्यांच्या निधनावर हुपरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला.

विशाल चौगुले हे हातकणंगले येथे राहतात. हुपरी पोलीस ठाण्यात ते पोलीस नाईक म्हूणून कार्यरत असून कारकून म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. सर्वांशी हसत खेळत असणाऱ्या त्यांच्या स्वभावामुळे ते सर्वाना परिचित होते. आज सकाळी ते ठाण्यात कर्तव्यासाठी आले. आपल्या कार्यालयात कार्यरत असतानाच त्यांना (heart attack) त्रास सुरू झाला.

त्यानंतर ते पोलीस कर्मचारी भांगरे यांच्यासोबत इचलकरंजी येथील निरामय दवाखान्यात गेले. तेथेच त्यांना (heart attack) हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर हुपरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना अश्रू आवरता आले नाहीत. सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्यासह कर्मचारी इचलकरंजीला रवाना झाले आहेत. विशाल यांच्या निधनामुळे हुपरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :


Disha Patani : स्कर्ट सावरत opps मोमेंटची शिकार

Leave a Reply

Your email address will not be published.