श्री.नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

atmosphere

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा

श्री.नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीची 71 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या श्री व्यंकटेश महाविद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात (playful atmosphere) संपन्न झाली. ” शैक्षणिक गुणवत्ता , क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये संस्थेच्या सर्व शाखांचे कार्य अत्यंत उत्कृष्टरित्या सुरू आहे ” अशा शब्दात संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले(playful atmosphere). संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी बाबासाहेब वडींगे यांनी  “संस्थेच्या विविध ज्ञानशाखा नव्या युगाचा व स्पर्धेच्या जगाचा आढावा घेत वाटचाल करीत आहेत , अशाप्रकारे संस्थेची यशस्वीरित्या वाटचाल चालू आहे” असे आपल्या प्रास्ताविकातून मत मांडले.

विषय पत्रिकेतील सर्व विषयांचे वाचन पुरुषोत्तम पुराणिक यांनी केले. याप्रसंगी सभेमध्ये टाळ्यांच्या गजरात सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून स्वर्गीय मदनलालजी बोहरा शेठजी व हरिषजी बोहरा शेठजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी नूतन विश्वस्त म्हणून कृष्णा श्रीनिवासजी बोहरा यांची नियुक्ती करण्यात आली.त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी श्री . बाबासाहेब वडींगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे विश्वस्त ॲड. सत्यनारायण ओझा , लक्ष्मीकांतजी पटेल , मारुतराव निमणकर अहमद मुजावर , महेश बांदवलकर , श्रीकांतजी चंगेडिया , रामकिशोर तिवारी , आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते . आभार संस्थेचे विश्वस्त श्रीकांतजी चंगेडिया यांनी मानले . कार्यक्रमाची सांगता प्रकाश शिंदे यांनी गायलेल्या पसायदानाने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले.

 

Smart News:-