इचलकरंजीच्या शशांक बावचकर यांना मिळाला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला मतदान करण्याचा अधिकार

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा

अखिल भारतीय काँग्रेसच्या (current political news)राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत इचलकरंजी तून प्रदेश सदस्य सचिव शशांक बावचकर यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. इचलकरंजीतून मतदान करणारे ते एकमेव सदस्य असणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये (current political news)मतदान करण्यासाठी जिल्ह्यातील 17 व्यक्तींना मताचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये इचलकरंजीतून प्रदेश सदस्य सचिव शशांक बावचकर यांना मतदान करण्याची संधी प्राप्त झाली आहे. 19 सप्टेंबर रोजी मुंबईत महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या.

इचलकरंजीतून शशांक बावचकर यांना राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी मतदान करण्याची संधी मिळाली आहे. बावचकर कुटुंबीयांचा काँग्रेसमधील सक्रिय कुटुंबामध्ये समावेश होतो. त्यांचे वडील मल्हारपंत बावचकर हे दोन दशके इचलकरंजी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यानंतर शशांक बावचकर यांनी इचलकरंजीमधील काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

इचलकरंजी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या नगरसेवकाच्या कार्यकालामध्ये त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.अन्यायाला वाचा फोडली आहे. शासन विरोधात आंदोलन करून इचलकरंजीतील पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला आहे. एका सच्चा कार्यकर्त्याला मतदान करण्याची संधी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हेही वाचा :