दोघा सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

दोघा सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

इचलकरंजी: विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अक्षय सावंता नरळे (रा. गणेशनगर) याला १ वर्षासाठी तर योगेश उर्फ बारक्या सुरेश कवडे (रा. विवेकानंदनगर कोरोची) याला ६ महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपा (Deportation) करण्यात आले आहे. या संदर्भातील प्रस्तावाची पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामुनी यांची चौकशी करून अहवाल उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांनी प्रस्ताव मंजूर केले.

पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनेवरुन शहापूर पोलिसांनी विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या अक्षय सावंता नरळे व योगेश उर्फ बारक्या सुरेश कवडे या दोघांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून ते पोलिस उपअधिक्षक महामुनी यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्याची चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी डॉ. खरात यांनी नरळे याला १ वर्षासाठी तर योगेश कवडे याला ६ महिन्यांसाठी हद्दपार(Deportation) आदेश दिले आहेत. अक्षय नरळे याच्यावर शिवाजीनगर, शहापूर पोलिस ठाण्यात खून, घातक हत्यारासह जाळपोळ, नुकसान, असे २ तर योगेश कवडे यांच्यावर गावभाग, शिवाजीनगर, हातकणंगले व शहापूर पोलिस ठाण्यात खून, दरोडा, विनयभंग, मारामारी, चोरी व जुगार असे ६ गुन्हे दाखल आहेत. या प्रस्तावाचे विस्तृत काम शहापूर पोलीस ठाण्याचे साजिद करणे, व पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे सागर हारगुले यांनी पाहिले.

 

Smart News:-

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार सात जणांवर गुन्हा


कोल्हापूरला खंडपीठ होणे गरजेचे राऊत यांचे वक्तव्य


‘क्‍वाड’ बैठकीतून काय साधले?


निखतच्या जिद्दीची कहाणी


सतत थकल्यासारखं वाटतं? १५ दिवसात रक्ताची कमतरता दूर करतील रोजच्या जेवणातले ४ ‘फूड कॉम्बिनेशन्स’


 

Leave a Reply

Your email address will not be published.