इचलकरंजीत मुसळधार, तर काही ठिकाणी संततधार

इचलकरंजी : दोन दिवसांपासून वरुणराजाने थोडीशी उसंत घेतली असली तरी धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ (increase in level) कायम आहे. बुधवारी सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी ६४.४ फुटावर पोहोचली असून पूराच्या पाण्याची वाटचाल इशारा पातळीच्या दिशेनं सुरु आहे.

पाणी पातळीत वाढ होत चालल्याने इचलकरंजी– हुपरी मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी सायंकाळनंतर बंद करण्यात आला आहे. पंचगंगेची इशारा (increase in level) पातळी ६८ फुटावर तर धोका पातळी ७१ फुटावर आहे.

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. अनेक जिल्ह्यांना पुन्हा झोडपून काढलेलं (Flood) आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस पडताना दिसत आहे. तर, हवामान खात्याकडून (IMD Alert) हे पुढचे काही तास पावसाचे राहणारा असल्याचा इशारा देण्यात आलाय.

मुंबईतही पावसाच्या कोसळधारा सतत सुरूच आहेत. सातारा, सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूरलाही पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या प्रत्येक वेगवान अपडेट तुम्ही या ठिकाणी पहा..

Smart News :


शिरोळ पोलिसांची मोठी कारवाई; सुमारे १० लाखाची सुगंधी सुपारी व तंबाखू जप्त