जनावरांच्या लंपी आजारावर माणुसकीचा डोस

विशेष वृत्त स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा

तो शहरातून अनवाणी फिरतो, नेहमी चार – पाच मुले सोबतीला असतात, शहरात कोणतीही घटना घडली की त्यांची उपस्थिती असते.अशी माणुसकी जपणारे रवी जावळे हे आता जनावरांच्या वर आलेल्या लंपी(disease) आजाराच्या रूपाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

रवी जावळे यांनी इचलकरंजी शहर आणि परिसरात माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून माणुसकी जपण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे झाली सुरू केला आहे(disease). रवी जावळे हे कोरोना काळात राबविलेल्या अन्नदान चळवळी मुळे सर्वाधिक चर्चेत आले होते.त्यांनी कोरोना काळात ४८ हजार किलो धान्य शिजवून ४ लाख ४०० पॉकिटचे वाटप केले.ही मोहीम त्यांनी २१५ दिवस राबविली.इचलकरंजी नव्हे तर कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी,चंदुर, रुई आदी परिसरात ही त्यांनी या काळात मदत केली होती. त्याचा मोठा आधार गरीब आणि गरजू लोकांना मिळाला  होता.रस्त्याच्या कडेला असलेल्या निराधारांना अंघोळ घालून त्यांची रवानगी निराधार केंद्रात करण्याचे काम ते गेली अनेक दिवस करीत आहेत.

एखादा माणूस अडचणीत असल्यास किंवा बेवारस मयत झाल्यास पोलिसांना तात्काळ माणुसकी फाऊंडेशनची होते.ते मदत करतात.
आता गाय आणि बैल यांना लागण होऊ लागलेल्या लंपि आजारामध्ये ही रवी जावळे आणि टीम ने उडी घेतली आहे.इचलकरंजी शहरात फिरणारे मोकाट जनावरे राजीव गांधी सांस्कृतिक भवन मध्ये एकत्र करून त्यांनी डॉ चिंगबीरे यांच्या मदतीने २६ जनावरांच्या वर उपचार केले आहेत.

लसीकरण करून जनावरांना जगविण्यासाठी माणुसकी फाउंडेशन ची धडपड सुरू आहे.शंबर मुलांच्या मदतीने त्यांनी हे मुक्या प्राण्यांना वाचविण्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे. मारकी जनावरांना एकत्र करून त्यांना लसीकरण करणे सोपे नाही मात्र ते शिवशनुष्य रवीने उचलले आहे.आशना मदतीचा हात देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

हेही वाचा :