सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट इचलकरंजी मध्ये उद्योजक मेळावा संपन्न !

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट इचलकरंजी चॅप्टर मधील उद्योजकांनी (entrepreneur)इचलकरंजी आणि परिसरातील उदयोजकंसाठी केलेला “टाइम मॅनेजमेंट, नेटवर्किंग” या विषयावर उद्योजक मेळावा संपन्न !
संम्पूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांनी(entrepreneur) उद्योजकांसाठी चालवलेली चळवळ म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट.
उद्योजकतावृध्दी, टाइम मॅनेजमेंट, नेटवर्किंग व सॅटर्डे क्लब ह्या प्लॅटफॉर्म ची ओळख या विषयावर शनिवार दि. 16 एप्रिल 2022 रोजी उद्योजकांसाठी एकत्रित चर्चा व मेळावा संपन्न झाल्याची माहिती इचलकरंजी चैप्टर चे चेअरपर्सन श्री सुहास पाटील
श्री. विकास लोहार (सेक्रेटरी) आणि श्री. अलिम शेख (ट्रेजर्रर) यांनी दिली.
ह्या संदर्भात ते पुढे म्हणाले,
उद्योजक श्री.उज्वल साठे,( सदस्य एलीट क्लब) , टाइम मॅनेजमेंट बद्दल खूप सखोल अभ्यासक मार्गदर्शन केले.
उद्योजक श्री.विशाल मंडलिक (रिजन हेड)
क्लब विषयी माहिती दिली त्यामधे कोविड काळात 50 पेक्षा जास्त व्हेंटीलेट्ररर्सं, ब्लड डोनेशन कॅम्प, पूरग्रस्तांना सर्व प्रकारची मदत, ग्रहीनींसाठी त्यांनी बनविलेले पदार्थ कसे जगभरातील मार्केट मध्ये कसे पोहोचले पाहिजेत या बद्दल माहिती दिली.ह्या मार्गदर्शन कार्यक्रमात 80 पेक्षा अधिक उद्योजक सहभागी झाले होते यामध्ये सर्वांच्या व्यापाराची ओळख व रेफ़रन्स द्वारे व्यवसायवृध्दी हा मानस होता . सर्व साधारण व्यवसायीक सुद्धा लाखोंच्या उलाढाली, कोटीच्या उलाढाली , अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट व मोठी बिजनेस डील, आपला व्यवसाय संपूर्ण भारत व भारता बाहेर ही कसा गेला आहे यांच्या उदाहरण सहीत माहिती दिली. नवउद्योजक काही स्वप्ने पहात असेल, अर्थिक उन्नतीचे धडे, भारताबाहेरील संधी शोधत असेल तर ह्या सर्व गोष्टी, ह्या एकाच प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून अतिशय सोप्या रितीने कशा सहज शक्य आहेत हे लक्षात आणून दिले.
आज फ़क्त महाराष्ट्र मध्ये ७२ हुन अधिक चॅप्टर्सद्वारे अडीच हजार हुन ही अधिक उद्योजक एकत्रित येऊन आपली स्वप्नपूर्ति करत आहेत. इचलकरंजी व परिसरातील सर्व उद्योजकांसाठी हीच सोन्याची संधी उपलब्ध करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला 80 उद्योजक उपस्थित होते. रूनवाल टॉवर , PNG ज्वेलर्स बिल्डिंग, इचलकरंजी येथे शनिवारी 16 अप्रैल 2022 रोजी संध्याकाळी 5 ते 10 वाजता संपन्न झाला, कोल्हापूर हूनयामा इंजिनिअर्स, सांगली हून चिंतामणी मोटर्स, इचलकरंजी येथील ग्रीनसन सोलर सोल्यूशन्स, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स, श्री दत्त भेळ, OTW फ्युअल्स, SM इलेक्ट्रिक, टेन्ट ओ पॅन्ट, इ. उद्योजक उपस्थित होते.
हेही वाचा :