इचलकरंजी: जामिनावर सुटताच एका गुन्हेगारांने काढली रॅली

इचलकरंजी कारागृहातुन जामिनावर सुटताच एका गुन्हेगारांने शहरात मोटरसायकल (motorcycle) रॅली काढल्याची चर्चा होती. याबाबतचे व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत होते. याची चर्चा शहरात रंगली आहे. याबाबत पोलीस कोणती भूमिका घेतात ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

इचलकरंजी शहरात वाढत्या गुन्ह्यागारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोक्कासह अन्य कारवाई करण्यात आल्या. विविध गंभीर गुन्ह्याखाली अनेक टोळ्यामधील सदस्य सद्या जेलमध्ये आहेत. पॅरोलवर तसेच जामीनावर अनेक गुन्हेगार सद्या जेलबाहेर येत आहेत. नुकत्याच मोक्काच्या गंभीर गुन्ह्यातील एका गुन्हेगाराला जामीन मंजुर झाल्यानंतर जेलमधून त्याची सुटका झाली.

जेलमधुन सुटका होताच (motorcycle) मोटारीतून तो इचलकरंजीकडे आला. तसेच मोटरसायकल रॅली काढून कर्नकर्कश हॉर्न व जोरदार घोषणाबाजी करत जणु त्याचे स्वागतच करण्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. पोलिसांचा गुन्हेगारी रोखण्यासाठी आटापिटा सुरू असताना पुन्हा गंभीर गुन्ह्यातून सुटलेल्या गुन्हेगारांचे मिरवणुक काढण्यापर्यंत मजल पोहचत असल्याने डोकेदुखी वाढली आहे.

यापूर्वीही अनेकवेळा असे प्रकार घडले आहेत. सोशलमिडीयावर व्हिडीओ व्हायरल होण्यासह उलट-सुलट चर्चेला उत आला आहे. पोलीस अशांबाबत कोणती भूमिका घेतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा: