इचलकरंजी: पर्यावरण पुरक गणेश विसर्जनास प्रतिसाद

इचलकरंजी: पर्यावरण पुरक विसर्जनास(Ganesha Visarjan) महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मंडळाच्या गणेश मुर्तीचे विसर्जन शहापूर खण तसेच कृत्रिम तलावामध्ये करुन मौल्यवान सहकार्य केले. शुक्रवारी एकुण ५२९ गणेश मूर्तीचे विसर्जन शहापुर खण तसेच महापालिका निर्मित कृत्रिम तलावामध्ये केले. अनंत चतुर्थी दिवशी सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरण पुर्वक होणेसाठी यावर्षी महानगरपालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक यांनी शहापूर खण तसेच महानगरपालिके कडुन तयार करण्यात आलेल्या कृत्रिम – तलावामध्ये करावे असे आवाहन केले होते. सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्ती विसर्जनाची व्यवस्था शहापूर हायस्कूल मागील विसर्जन स्थळ,ओपन जीम जवळ आणि बालाजी नगर पद्मा पॅलेस समोर या ठिकाणी आणि महानगरपालिका निर्मित ५ कृत्रिम तलावामध्ये क्रेनसह विसर्जनाची व्यवस्था करणेत आलेली होती.

गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी सहा. आयुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत संगेवार, शहर अभियंता संजय बागडे, जल अभियंता सुभाष देशपांडे, नगर रचनाकार रणजित कोरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, यांचेसह सर्व विभाग प्रमुख, सर्व इंजिनिअर, स्वच्छता निरिक्षक, प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभागा कडील एकुण ३०० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सह आधार रेस्क्यू फोर्स, स्पेशल कमांडो फोर्स, शहरातील पट्टिचे पोहणारे स्वयंसेवक तसेच २ यांत्रिक बोटी, ४ क्रेन, २ अग्निशमन वाहन, ४ (इचलकरंजी रुग्णवाहिका महानगरपालिका, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय(Ganesha Visarjan), सेवाभारती सामान्य रुग्णालय, रुग्णालय, क. बा. आवाडे चॅरिटेबल ट्रस्ट ) यांचा समावेश होता. या संपूर्ण महापालिका यंत्रणेवर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि प्रभार अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख संपूर्ण वेळ नियंत्रण ठेवून होते. महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल प्रभारी अधिकारी तथा सुधाकर देशमुख यांनी मंडळांचे आभार व्यक्त केले.

Smart News:-