इचलकरंजीत चार चेन स्नॅचरना पकडले

chain snatchers

दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत; आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

इचलकरंजी: महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यात धुमाकूळ घातलेल्या चेन स्नॅचिंग(chain snatchers) करणाऱ्या आतंरराज्य टोळीला गजाआड करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. मागील तीन महिन्यातील शहरातील चेन स्नॅचिंगच्या तीन घटना उघडकीस आल्या असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

अब्बास अस्लम झैदी (वय ३१ रा. अंबेवली ठाणे), शरीफ शहा समरेश शहा (वय २६ रा. मनमाड जि. नाशिक), रफिक कासीमभाई मदारी (वय ३५ रा. • पिलखेडा जि. जळगांव) व राजेश रामविलास सोनार (वय ३६ रा. उल्हासनगर जि. ठाणे) यांच्याकडून

 

२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमालही

हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांनी दिली. जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्याच्या कालावधीत ३ जानेवारी आणि ११ व २५ मार्च रोजी शहरातील विविध भागात चेन स्नॅनिंगच्या(chain snatchers) घटना घडल्या होत्या. गोकुळ चौक परिसरातील शिला तुकाराम पोरे (वय ६१) या पायी निघाल्या असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूम स्टाईलने त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले होते.

तर ३ जानेवारी व २५ मार्च रोजी कबनूर आणि इचलकरंजी परिसरात वृध्दांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अशा तऱ्हेने लंपास करण्यात आले होते. या तिन्ही चोरी प्रकरणी शिवाजीनगर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना बीड, परभणी, लातूर, जळगांव, बेळगांव व गोवा याठिकाणीही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले.

अब्बास झैदी व त्याचे तीन साथीदारांनी या चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जळगांव पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या चौघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपासादरम्यान गुन्ह्यांचे घटनास्थळावरील व आरोपींनी गुन्हा करुन येताना व जाताना गेलेल्या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज व अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे शहरात या चोरट्यांनी चेन स्नॅचिंग(chain snatchers) केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिस उपअधिक्षक महामुनी यांनी सांगितले.

चोरट्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ४० ग्रॅम वजनाचे २ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या टोळीने जिल्ह्यात आणखीन कोठे गुन्हे केले आहेत का या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे पोलिस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.

या टोळीने महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यात जवळपास २५ ते ३० गुन्हे केले असून त्याचा छडा लागला आहे. त्यामध्ये शहरातील ३ चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक महादेव वाघमोडे, उपनिरिक्षक मनोज पाटील, सहाय्यक फौजदार ठाणेकर, हवालदार सीमा डोंगरे, पोलिस नाईक सागर चौगुले, विकास कुरणे, पोलिस अंमलदार सुनिल बाईत, विजय माळवदे, सतिश कुंभार, अमित कांबळे, गजानन बरगाले, प्रविण कांबळे, पवन गुरव आदींच्या पथकाने केली.

Smart News:-

IPL 2022: BCCI कडून पदड्यामागील हिरोंचा सन्मान;


उष्माघात, निर्जलीकरण आणि अतिसार टाळण्यासाठी प्या बेलाचे सरबत;


HDFC चे 100 ग्राहक झाले अचानक मालामाल, खात्यात आले 13 कोटी


सीआरपीएफचे ९६२ जवान देशसेवेसाठी सज्ज;


त्याग म्हणजे सहयोगाची भावना


 

Leave a Reply

Your email address will not be published.