इचलकरंजी :भरधाव स्पोर्टबाईकच्या धडकेत चीमुकल्याचा दुर्देवी मृत्यू!

इचलकरंजी येथील जवाहरनगरमध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्पोर्ट बाईक (sports bike) चालवून एका सहा वर्षाच्या मुलाला जोराची धडक दिली. त्यामध्ये जखमी झालेल्या बालकाचा आज, शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आदित्य अधिनाथ जाधव असे मृत बालकाचे नाव आहे. या अपघातात मोटरसायकलस्वारही जखमी झाला आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अल्पवयीन मुलांना बेकादेशीररीत्या मोटरसायकल दिल्या जात असल्याने संतापही व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जवाहरनगर परिसरातून एक अल्पवयीन तरुण स्पोर्ट बाईक (sports bike) घेऊन भरधाव वेगाने निघाला होता. त्यावेळी त्याने आदित्यला जोराची धडक दिली. यात मोटरसायकलस्वार अल्पवयीन मुलगाही जखमी झाला. दोघांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले.

sports bike

जखमी आदित्यला बालकाला आयजीएम रुग्णालय प्रथम उपचार करून कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अपघात करणारा अल्पवयीन तरुण हा मुळचा वडगाव येथील असून तो इचलकरंजीत नातेवाईकांकडे आला आहे.

हेही वाचा :


सामंथाचा बॉयफ्रेंड होणार माजी क्रिकेटर श्रीसंत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *