इचलकरंजी: ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत ध्वज वितरणास प्रारंभ

इचलकरंजी: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ऑगष्ट से १५ ऑगष्ट यादरम्यान संपूर्ण देशात प्रत्येक नागरिकांने आपल्या घरावर, दुकानांवर तसेच शासकीय – निम शासकीय, सहकारी संस्था यांनी आपल्या कार्यालयाच्या इमारतीवर आपला तिरंगा ध्वज (indian flag) फडकविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सदर उपक्रम इचलकरंजी शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने शहरातील सर्व मिळकत धारकांना तिरंगा ध्वज(indian flag) वितरीत करणेचा प्रारंभ आज दि. ८ ऑगष्ट पासून करणेत येणार आहे. महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय ए झोन, जुनी नगरपरिषद इमारत. विभागीय कार्यालय बी झोन, शाळा क्रमांक २१, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ. विभागीय कार्यालय सी झोन,

बाळासाहेब माने सांस्कृतिक भवन. विभागीय कार्यालय डी झोन, शहापुर चौक, पाण्याच्या टाकी जवळ या चारही विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना ध्वज बितरण करण्यात येणार आहे(indian flag). नागरिकांनी आपल्या घराशेजारी असलेल्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून आपला ध्वज खरेदी करणेचा आहे.

महानगरपालिके कडुन या ध्वजाची २० रुपये इतकी किंमत आकारण्यात येणार असून नागरिकांनी स्वेच्छेनुसार २० रुपये भरुन ध्वज खरेदी करावा तथापि जे नागरिक २० रुपये भरु शकणार नाहीत त्यांना सुद्धा महानगरपालिके कडुन ध्वज मोफत देणेत येणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घराजवळच्या विभागीय कार्यालयातून ध्वज खरेदी करावा असे जाहीर आवाहन उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांचे कडुन करणेत येत आहे.

Smart News:-

इचलकरंजी: पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर…


भारतीय खेळाडूंच्या आजच्या सामन्यांची वेळ जाणून घ्या, बॉक्सिंग, कुस्तीकडून मेडल्सची अपेक्षा


जेईई-मेन परीक्षेत 24 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; १३ भाषांमध्ये झाली परीक्षा


अमेरिकेच्या मुंबईतील कॉन्सुल जनरलपदी हँकी; रविवारी स्वीकारला कार्यभार


आर्थर राेड जेलमध्ये संजय राऊतांचा मुक्काम; औषधे अन् घरचे जेवण मिळणार


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *