इचलकरंजी: जिल्हा घर कामगार संघटनेचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा

इचलकरंजी:- घरेलु कामगारांना आठवड्यातून एकदिवस पगारी सुट्टी मिळावी, दरमहा 18 हजार रुपये किमान वेतन मिळावे आदींसह विविध मागण्यांसाठी सीआयटीयु संलग्न कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले(Workers Association). आमच्या मागण्या हक्काच्या, न्यायाच्या व कायदेशीर असल्याने त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
नुकतीच नवीदिल्ली येथे घरेलू कामगारांची राष्ट्रीय परिषद झाली. त्यामध्ये घरेलू कामगारांना आठवड्याची सुट्टी मिळत नाही, किमान वेतन, कल्याणकारी योजना मिळत नाहीत, त्यांना सापन्नभावाची वागणूक दिली जात असल्याने घरेलु कामगार हे आधुनिक काळातील वेठबिगारीच आहेत असा निष्कर्ष काढत परिषदेची सांगता करताना 1 डिसेंबर आंतरराष्ट्रीय वेठबिगारी विरोधी दिवस म्हणून साजरा करण्याचा व घरेलू कामगारांना किमान वेतन आणि आठवड्याला एक दिवस पगारी रजा या महत्वाच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मागणी दिवस म्हणून हा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी शहरातील घरेलू कामगारांचा मोर्चा आज काढण्यात आला. निवेदनात, घरेलू कामगारांना 18 हजार किमान वेतन मिळावे(Workers Association), आठवड्यातून एक दिवसाची पगारी सुट्टी मिळावी, 10 हजार रुपये सन्मान धन मिळावे, वयाच्या 60 वर्षापासून महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळावी, स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे आदी मागण्या नमुद केल्या आहेत.
आंदोलनात कॉ. दत्ता माने, पार्वती जाधव, शाजादबी मुजावर, माया सुतार, सुवर्णा देवसानी, उज्ज्वला शेलार, छबू शिकलगार, लता हेगडे, सविता कटारे, सुलोचना नीलकंठ, सैफनबी शेख, चैताली बुड़के, लता जाधव, निकिता कांबळे, सुनिता पन्हाळकर, आशा गाडे यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.
Smart News:-