इचलकरंजी: इतके तास चालली इचलकरंजीतील गणेश विसर्जन मिरवणुक

Dolby

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा: गणरायाचा अखंड जयघोष, डॉल्बीचा(Dolby) दणदणाट, झांजपथक व बेन्जोचा निनाद, मनोहारी लेसर शो आणि ढोल-ताशांच्या कडकडाटावर ठेका धरणार्‍या कार्यकर्त्यांच्या उत्साहात भव्यदिव्य गणेश मूर्ती आणि आकर्षक आरास अन् या सर्वाला मिळालेली वरुणाराजाची साथ अशा काहीशा विविधरंगी भावपूर्ण वातावरणात गणेशाला अखेरचा निरोप देण्यात आला. किरकोळ वादाचे प्रकार वगळता शांततापूर्ण वातावरणात तब्बल २२ तास चाललेल्या मिरवणूकीत वरुणराजानेही हजेरी लावली.

Dolby

परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव गणेशोत्सव मंडळाच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन शिवतीर्थ येथून विसर्जन मिरवणूकीचा प्रारंभ करण्यात आला.  बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनीसुध्दा गाण्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला. तर महिला होमगार्डनीं झिम्मा फुगडीचा फेर धरत मिरवणुकीत सहभाग घेतला.

Dolby
इचलकरंजीत गणेशमूर्ती विसर्जनावरून वाद निर्माण झाला होता. श्री मूर्तीचे पंचगंगेत विसर्जन करण्याच्या भूमिकेवर आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने हे ठाम होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून कृत्रिम जलकुंडाची सोय करण्यात आली होती. या पर्यावरणपूर्वक विसर्जनास नागरिकांची उदंड प्रतिसाद दिला. नदीत विसर्जन करण्यास प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची आडकाठी न करण्यात आल्याने अनेक सार्वजनिक मंडळांनी पंचगंगा नदीत विसर्जन केले.गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली होती. शनिवारी सकाळी ९ च्या दरम्यान मिरवणुकीतील शेवटच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.तब्बल २२ तास गणेश विसर्जन मिरवणूक चालली(Dolby).

Dolby

Dolby

आकर्षक गणेश मूर्ती
या वर्षी शहरातील अनेक गणेश मंडळांनी भव्य गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.भव्य आणि वेगवेगळे धार्मिक संदेश देणाऱ्या मुर्त्या मुख्य मार्गावर आल्यानंतर गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत होते.आकर्षक मुर्त्याने सर्वांना मोहित केले.उच आणि भव्य मूर्ती प्रकाश झोत आणि लेसर किरणांनी झळाळून निघाल्या होत्या(Dolby).

स्वागत कमानी आणि सामाजिक संस्था
कॉ. मलाबादे चौक ते नदीवेस नाका या मार्गावर इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी, मुस्लिम वेल्फअर असोशिएशन, मारवाडी युवा मंच, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दै. राष्ट्रगीत, श्री साईप्रसाद ग्रुप, के्रडाई व बिल्डर्स असोशिएशन, भारतीय जनता पाटील, अखिल भारतीय होलार समाज, माऊली फौंडेशन, हिंदु एकता, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवगर्जना सेवाभावी संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना शिंदे गट, इचलकरंजी फेस्टिवल व जय शिवराय मंडळ असे विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. या व्यासपीठाच्या माध्यमांतून विसर्जन मिरवणूकीतील सहभागी सार्वजनिक गणेश मंडळाचे मानाची पान-सुपारी, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते. तर मैत्री परिवार तसेच विविध सामाजिक संघटनेच्यावतीने भक्तांच्यासाठी पिण्याचा पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता.

पावसाची हजेरी
शुक्रवारी दुपारनंतर सुरु झालेल्या विसर्जन मिरवणूकीत दुपारी 5 नंतर आलेल्या जोरदार पावसामुळे सुमारे दोन तासांचा व्यत्यय आला. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सातनंतर मिरवणूक सुरु झाली. मध्यरात्री बारानंतर वाद्यांचा गजर बंद झाल्याने केवळ जयघोष करत सुरु असलेल्या मिरवणूका पहाटेपर्यंत सुरु होत्या. शनिवारी सकाळी साठेआठ वाजता विसर्जन मिरवणूकीची सांगता झाली. तर दोन ते तीन मंडळांच्या गणेशमूर्ती इतरत्र ठेवण्यात आल्याच्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्या मूर्तींचे विसर्जन केले. मिरवणूकीत महिला व तरुणींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. काही मंडळांनी त्यासाठी विशिष्ठ असा ड्रेसकोड केल्याने त्या मिरवणूका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. दुपारी सुरु झालेल्या पावसाने दोन तासानंतर उघडीप दिल्यानंतर मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक जमत होते. रात्रीच्या सुमारास तर मुख्य रस्त्यावर अलोट गर्दी लोटली होती.

रात्री बारानंतर केवळ जयघोष
राज्य शासनाने गणेशोत्सवात अखेरच्या पाच दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत वाद्ये आणि साऊंड सिस्टिम सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार रात्री बारानंतर पोलिस प्रशसानाकडून सर्व मंडळांसह स्वागत कक्षांना सूचना देत वाद्ये, साऊंड सिस्टिम बंद करावयास लावले. त्यामुळे अनेक मंडळांनी लाखो रुपये खर्चुन आणलेले लेसर शो, डॉल्बी साऊंड(Dolby) हे केवळ अत्यल्प काळच दिसले व वाजले. रात्री बारानंतर सर्व काही बंद करावे लागल्याने आकर्षक मिरवणूक ही केवळ जयघोष करत पुढे न्यावी लागली. परिणामी कार्यकर्त्यांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.

वीज कर्मचार्‍यांचे कौतुक
यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवरील बंधने हटविण्यात आल्याने अनेक मंडळांनी भव्य आणि दिव्य अशा गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. पाच फुटापासून ते सुमारे 28 फुटापर्यंत गणेशमूर्ती असल्याने त्या नेताना विसर्जन मार्गावर होणार्‍या विद्युत तारांचा अडथळा होऊ नये अथवा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महावितरणचे सर्व कर्मचारी अखंडीतपणे सेवारत होते. अडचण येईल तेथे वीज पुरवठा बंद करुन मूर्ती पुढे नेल्यानंतर पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाबद्दल या कर्मचार्‍यांचे कौतुक होत होते.

Smart News:-